google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सांगोला शहरात आज भव्य शोभायात्रा

Breaking News

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सांगोला शहरात आज भव्य शोभायात्रा

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सांगोला शहरात आज भव्य शोभायात्रा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

“मानवतेचा दीप, भाईचाऱ्याचा उत्सव”

सांगोला प्रतिनिधी : सांगोला शहरात आज श्रद्धा, आनंद आणि ऐक्याचा महापर्व साजरा होणार आहे. जश्ने ईद-ए- मिलादुन्नबीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलूस कमिटीच्या वतीने 

आज भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी आठ वाजता शाही जामा मस्जिद (छ.शिवाजी महाराज चौक) 

येथून या जुलूसाला सुरुवात होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत नागरिकांना हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या शिकवणीचे स्मरण करून देण्यात येणार आहे.

             यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे, कारण हे वर्ष हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या पंधराशेव्या जयंती वर्षाचे आहे. पैगंबरांनी मानवतेला दिलेला समानता, 

शांती, भाईचारा व करुणेचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक आहे. त्यांच्या शिकवणीचा अर्थ आजच्या समाजजीवनात एकतेचा सेतू बांधण्यास अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

           या आजच्या शोभायात्रेत सर्व धर्मीय बांधव सहभागी होणार असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत उदाहरण शहरात पाहायला मिळणार आहे. जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी चे अध्यक्ष शौकत खतीब, उपाध्यक्ष आयाज बाबा मणेरी, 

खजिनदार अब्दुल कादिर इनामदार, सचिव समीर खाटीक यांनी असे आवाहन केले आहे की, “सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सांगोला शहरात प्रेम आणि सौहार्दाचा दीप उजळवावा.”

              भेदभाव मिटवा, सौहार्द जोपासा हाच पैगंबरांचा खरा संदेश. ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजे फक्त उत्सव नव्हे, तर मानवतेच्या मार्गाची आठवण आहे. एकतेच्या जुलूसातून जगाला बंधुत्वाचा मार्ग दाखवूया. फुलांनी सजलेले रस्ते, 

भाविकांचे गजर, धार्मिक ध्वनी आणि पैगंबरांच्या शिकवणीवर आधारित प्रवचनांनी सांगोला शहर आज उजळून निघणार आहे. ही शोभायात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून भाईचारा, एकता आणि मानवतेच्या तेजाचा उत्सव ठरणार आहे.

चौकट : 

जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या पावन निमित्त सांगोला शहरात (जुलूस) शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून सर्व मुस्लिम बांधवांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

हा जुलूस केवळ परंपरा नसून पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्या शिकवणींचा वारसा असून यात सहभागी होणे म्हणजे पैगंबरांविषयीचे प्रेम व्यक्त करणे होय. शाही जामा मस्जिद येथून सुरू होणारा

 हा जुलूस शहरातील विविध मार्गांनी पुन्हा जामा मस्जिद येथे संपन्न होणार आहे. त्यानंतर सलातो सलाम व फातिहाखानी होईल व उपस्थित सर्व बांधवांना लंगर (महाप्रसाद) वाटप केले जाणार आहे. तरी या भव्य जुलूसासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे.

    - शौकतभाई खतीब

अध्यक्ष जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी

Post a Comment

0 Comments