लोडशेडींग कमी करावे... आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे भेटून केली मागणी
लोडशेडींग कमी करण्याबाबात आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे केली मागणी..
सांगोला विधानसभा मतदार संघातील लोडशेडींग संदर्भात आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र देऊन लोडशेडींग कमी करण्याबाबात विनंती केली.
सध्या जे अतिरिक्त लोकशिडींग चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी असून शेतातील पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही.लोडशेडींगच्या नावाखाली दिवसा विज बंद ठेवली जाते
व रात्री विज चालू केली जाते ती ही सतत चालू बंद अवस्थेत त्यामुळे शेतकरी अक्षरशा हैराण झालेला आहे.आज मितीला विहरीला पाणी असल्याने शेतकरी काहीसा समाधानी असताना विजेया लपंडावने शेतकऱ्यांचे अत्यंत नुकसान होत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून मा.मुख्यमंत्री महोदयांनी की जे स्वता उर्जा मंत्री आहेत त्यांनी पुरेसा व वेळेत विज पुरवठा करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मंत्रालय येथे भेटून केली आहे


0 Comments