खळबळजनक..35 भाकरी खायचा, हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचा, पाणी नाही दूधचं प्यायचा, व्हायरल होणारा सुखा पाटील आहे तरी कोण?
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि खासकरुन इन्स्टाग्रामवर सुखा पाटील नावाचा माणूस चर्चेत आलाय. "35 भाकरी खायचा, हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचा, पाणी नाही दूधच प्यायचा", असं वर्णन सुखा पाटलांच केलं जातंय.
इन्स्टाग्रामवर सुखा पाटलांचं वर्णन करणारे व्हिडीओ तुफान व्हायरल देखील झाले आहेत. मात्र, इन्स्टाग्रामवर सुखा पाटलांचा विषय ट्रेंडिंगवर कशामुळे आला?
सुखा पाटील नेमके कोण आहेत? सुखा पाटलांचं वर्णन करणारा माणूस नेमका कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात..
सुखा पाटील सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले?
बंदा रुपया नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. सभोवतालच्या आणि मातीतल्या वयस्कर माणसांची गप्पा माराव्यात, त्यांच्या आयुष्यातील जुने किस्से जाणून घ्यावेत, अशी चॅनेलची थीम आहे.
या चॅनेलने सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातील बजीरंग कोळी यांच्याशी सर्वप्रथम बातचीत केली.
यावेळी बजीरंग कोळी यांना जुन्या काळात लोकांचं खाणं-पिणं कसं असायचं? असा प्रश्न बजीरंग कोळी यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नाचं उत्तर देताना बजीरंग कोळी म्हणाले, "सुखा पाटील सकाळीच 35 भाकरी खायचा. हजार कडब्याच्या पेंढ्या बांधायचा. तो पाणी प्यायचाच नाही, फक्त दूधचं प्यायचा. त्यावेळी शेळ्या भरपूर दूध द्यायच्या. त्याला काम फार असायचा.
सुखा पाटील मोठा राकिस होता. एका विहिरीतील पाणी तोच हालवायचा. 35 मक्याचे कणीस खायचा आणि एका वाफेच्या शेंगा संपवायचा. 5-6 सहा देशी ऊस देखील खायचा. एका विहिरीतील पाणी एकटा सुखा पाटील काढायचा.",


0 Comments