खळबळजनक...सांगोला शहरातील मोबाईल दुकान फोडले दुकान मालकाच्या सतर्कतेने संशयित चोरट्यास पोलिसांच्या मदतीने पकडले..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला अज्ञात चोरट्याने सांगोला शहरातील स्टेशन रोडवर असलेले मोबाईल दुकान फोडून दुकानात प्रवेश करून एक लाख ५९ हजार रुपये किमतीचे ११ महागडे मोबाईल संचही चोरून नेण्याचा प्रयत्न करीत असताना दुकान फोडल्याचा मेसेज मोबाईल दुकानदारास गेला.
मालकाने व पोकों मच्छिंद्र माळी यांनी अवघ्या काही मिनिटात दुकानात धाव घेतली व संशयित चोरट्यास रंगेहाथ पकडले असल्याची घटना शुक्रवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी संशयित चोरट्यास ताब्यात घेतले आहे. या चोरट्याकडून चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सांगोला शहरातील स्टेशन रोडवर विजय कुंडलिक राऊत यांचे द मोबाईल स्पेस नावाचे मोबाईल दुकान आहे. गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी आपले दुकान बंद केले व घरी गेले. दरम्यान, शुक्रवार, २९ रोजी पहाटे
दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानावर चढून वरील बाजूचा पत्रा व पीओपी कापून दुकानात प्रवेश केला व दुकानातील ४९ हजार ४९७ किमतीचे विवो कंपनीचे वाय १९ मॉडेलचे तीन मोबाईल संच,
२९ हजार ९९८ रुपये किमतीचे रोम मेमरी असलेले एकूण दोन मोबाईल संच, ४७ हजार ९९६ रुपये किमतीचे विवो कंपनीचे इ मॉडेलचे ४ मोबाईल संच, १३ हजार ९९९ रुपये किमतीचा ५ जी
आरपीएम कंपनीचा वाय १९ मॉडेलचा १ मोबाईल संच, १७ हजार ९९९ रुपये किमतीचा विवो वाय २९ कंपनीचा मोबाईल संच असे एकूण एक लाख ५९ हजार ४८९ रुपये किमतीचे ११ मोबाईल घेऊन पसार होणार
तेवढ्यात दुकान मालक व दुकानातील मॅनेजर यांना दुकान फोडले जात असल्याचा मोबाईलवर मैसेज दुकान मालक विजय राऊत व प्रवीण वाघमारे यांना गेला.
दरम्यान, दुकान मालक विजय राऊत यांनी प्रसंगावधान राखून शेजारी राहणारे पोकों मच्छिंद्र माळी यांना फोन करून ताबडतोब दुकानाजवळ अज्ञात चोरटा दुकान फोडत असल्याचे सांगितले.
अवघ्या १० मिनिटांत वरील तिथे पहाटे स्टेशन रोडवरील दुकानाजवळ आले व अज्ञात संशयित चोरट्यास पत्रा कापलेल्या जागेतून बाहेर येत असताना रंगेहाथ पकडले असल्याची घटना घडली आहे. संशयित चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अज्ञात चोरट्याने दुकान फोडल्याने दुकानमालक विजय राऊत यांचे हजारो रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. याबाबत विजय राऊत यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सपोनि सचिन जगताप करीत आहेत.


0 Comments