आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात ९९ हजार ८६२ घरांना मंजुरी'; प्रधानमंत्री आवास योजना, अनुदानाची रक्कम जमा
सोलापूर : दोन वर्षांत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ११ हजार ७७७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
यापैकी ९९ हजार ८६२ घरांना मंजुरी देण्यात आली असून ८० हजार १३१ जणांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
२०२४-२५ या वर्षातील १६९५ तर २०२५-२६ मधील ६१८५ घरांना मंजुरी देणे प्रलंबित आहे.
२०२४-२५ या वर्षात ६२ हजार २७५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी ५६ हजार ५४५ घरांना मंजुरी देण्यात आली.
यापैकी ५२ हजार २१ नागरिकांच्या खात्यावर पहिला हप्ता तर ३३ हजार ५३३ नागरिकांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. २०२५-२६ या वर्षात ४९ हजार ५०२ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते,
त्यापैकी ४३ हजार ३१७ घरांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ३८ हजार ४२ नागरिकांना खाते क्रमांक पडताळणी करण्यात आली. १९ हजार २२ जणांना पहिला हप्ता जमा करण्यात आला.
प्रधानमंत्री आवास योजनेचा मागील दोन्ही वर्षातील कामांचा आढावा घेण्यात आला. २०२४-२५ या वर्षातील प्रगती चांगली आहे. दुसरा हप्ता जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २०२५-२६ या वर्षातील मंजुरी
दिलेल्या अर्जदारांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १९ हजार ६२२ जणांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला, उर्वरित १८ हजार ४२० जणांच्या खात्यावर लवकरच हप्ता जमा करण्यात येणार आहे.
- संदीप कोहिणकर, प्रभारी प्रकल्प संचालक
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
२०२४-२५ तालुकानिहाय आकडेवारी
तालुका उद्दिष्ट मंजुरी
अक्कलकोट ४५२१ ४१३३
बार्शी ३०२३ २८९७
करमाळा ५१३२ ४६५१
माढा ५७८६ ५०८६
माळशिरस ३५१० २८३५
मंगळवेढा ४६७९ ४५३९
मोहोळ ४८६८ ३७४८
पंढरपूर ६१८४ ५८२०
सांगोला ४३७९ ३३५२
उत्तर सोलापूर २१६६ १७८३
दक्षीण सोलापूर ५२५४ ४४७३
एकूण ४९५०२ ४३३१७


0 Comments