google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील सासू व सून जागीच ठार

Breaking News

धक्कादायक! सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील सासू व सून जागीच ठार

धक्कादायक! सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील सासू व सून जागीच ठार


एका माल ट्रकने स्कुटीवर जाणाऱ्या दोन महिलेला चिरडले असल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 7.40 च्या दरम्यान मंगळवेढा-सोलापूर दामाजी कारखाना बायपास रोड येथे घडली आहे.

ही घटना इतकी भीषण होती की तासगावकर कुटुंबातील दोन महिला जागीच ट्रक अंगावर पडून चेंदामेंदा झाल्या होत्या.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज रविवार असल्याने सदगुरु यांच्या महिलांच्या बैठकीचे आयोजन केले जाते. त्या बैठकीसाठी तासगावकर कुटुंबातील सून व सासू दोघी बैठकीला जाणार होत्या.

दोघीजणी स्कुटी वरती जात असताना दामाजी कारखाना बायपास रोड येथे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने जोराची धडक मारली.

मालट्रकने जोराची धडक दिल्याने मालट्रक दोघींच्या अंगावरती पडून त्या दोघीजणी जागेवरच ठार झाल्या आहेत.

मालट्रकने स्कुटी गाडीला धडक दिली आणि यात स्कुटी ट्रकच्याखाली गेल्याने दोघीही चेंगरल्या गेल्या. यात सून आणि सासू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील दोघांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने मंगळवेढा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

घटनास्थळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, लातूरकर, ट्रॅफिकचे संभाजी यादव, 

प्रवीण जाधव, सचिन काळेल, पोलीस हवालदार सुरेश कांबळे, शिवाजी काळे, धनंजय आवताडे, दयानंद हजारे, ईश्वर दुधाळ आदीजन उपस्थित होते.

स्पीडब्रेकर दिसेल असा करा

बायपास वरून जाणाऱ्या रोडवरती गर्दीच्या ठिकाणी स्पीड बेकर असणे खूप गरजेचे आहे. स्पीड बेकर मोठा करून त्यावर पांढरा कलर कलर मारावा अपघात प्रमाण कमी होईल- समाधान हेंबाडे, प्रहार संघटना अध्यक्ष

Post a Comment

0 Comments