पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगोला बस स्थानकास दिली
भेट विद्यार्थी -विद्यार्थिनीसाठी पर्यावरण व छेडछाड विषयावर केली चर्चा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / प्रतिनिधी: पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगोला बस स्थानकात भेट देऊन शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यास, नियमित व्यायामाचे महत्त्व, आणि सुरक्षिततेबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,
“जर मुलींची छेडछाड झाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये अथवा निर्भया पथकाकडे तक्रार करावी. महिलांवरील अन्याय किंवा छेडछाड सहन न करता योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत तक्रार पोहोचवणे गरजेचे आहे.”
तसेच गावातील रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन करण्याचे महत्त्व सांगितले. हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये सजगता, जबाबदारी आणि सामाजिक भान निर्माण करणारे ठरले.
0 Comments