मोठी बातमी! आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या, धक्कादायक घटनेनं पंढरपूर हादरलं; परिसरात भीतीचं वातावरण
पंढरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपास सुरु केला आहे.
हत्येबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही
कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत.
तर आई सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे. लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली ? कुठल्या कारणावरुन झाली? याबाबत कुठलीच ठोस माहिती अद्याप पुढे आली नाही.
घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपास सुरू केला आहे.
0 Comments