google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..आषाढी वारीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि पत्नी देणार 'आरोग्य सेवा'

Breaking News

मोठी बातमी..आषाढी वारीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि पत्नी देणार 'आरोग्य सेवा'

मोठी बातमी..आषाढी वारीसाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि पत्नी देणार 'आरोग्य सेवा'


सांगोला : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांची पत्नी डॉ. निकिता देशमुख हे दाम्पत्य चार 

आणि पाच जुलै रोजी वैद्यकीय सेवा देणार आहेत.शासनाच्या वैद्यकीय कक्षामार्फत हे दोघेही पती-पत्नी स्वतः उपस्थित राहून सेवा देणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

दिंडीतुनी चालती भक्तजन बंधू |

सेवा करुनी वाढे आरोग्यसंधू ||

औषध देई डॉक्टर भक्तिभावें |

पांडुरंग चरणीं प्रेम ओसंडे ||

सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असून आमदार देशमुख अधिवेशनात उपस्थित आहेत. आमदार असताना सुद्धा वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा देण्याचा या डॉक्टर दांपत्याने ठरविले आहे‌. 

सध्या आषाढी वारीसाठी राज्यभरातून आणि परराज्यांमधून हजारो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत.

 मजल दरमजल करत, भक्तिभावाने दिंड्यांमधून हे वारकरी पंढरीकडे वाटचाल करीत आहेत. अशा भक्तांची सेवा करण्याच्या उद्देशाने देशमुख दाम्पत्य पुढे सरसावले आहे. 

डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. निकिता देशमुख हे दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील असल्यामुळे पंढरपूर जवळील दिंड्यांच्या मार्गावर ते ४ आणि ५ जुलै या दोन दिवसांमध्ये शासकीय वैद्यकीय कक्षांमधून सेवा पुरवणार आहेत.

 वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःहून सहभागी होत समाजापुढे एक आदर्श निर्माण करणाऱ्या या दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून वारकरी पायी चालत येत आहेत. वारी ही श्रद्धेची, सेवाभावाची परंपरा असून, वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा देणे हाच आमचा खरा भक्तिभाव आहे. 

पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या वारकऱ्यांची सेवा घडावी, हीच आमची भावना आहे. आम्ही दोघेही डॉक्टर असल्यामुळे शासकीय वैद्यकीय कक्षात उपस्थित राहून आम्ही वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत.

- डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार, सांगोला.

आपल्या हातूनही वारकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा घडावी ह्याच उद्देशाने आम्ही दोघेजण दोन दिवस वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी उपस्थित राहणार आहोत.

 वारीतील वारकऱ्यांसाठी अनेक जण आपल्या कुवतीनुसार सेवा करण्याचा प्रयत्न करीत असतो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आहे. आम्हीही वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

- डॉ. निकिता देशमुख (आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी)

Post a Comment

0 Comments