ब्रेकिंग न्यूज..नागपुर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी रास्ता रोको जिल्हादंडाधिकारी
यांचे आदेशाचा भंग करुन रास्तारोको; 71 जणांविरोधात सांगोला पोलीसांत गुन्हा दाखल
सांगोला(प्रतिनिधी):- नागपुर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी जमीनीचे होणारे संपादन रद्द करणे संदर्भात रस्ता रोको करून सांगोला-मिरज रोडवरुन जाणारे येणारे वाहनांना मज्जाव करून बेकायदा जमाव जमवुन जमावबंदी आदेशाचा तसेच धरणे आंदोलन,
मोर्चा, निदर्शने, उपोषण करणेस निबंध असताना मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापुर यांचे आदेशाचा भंग केला आहे. म्हणून सांगोला पोलीसांकडून 71 जणांविरोधात सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता
2023 चे कलम 126(2), 189(2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद गणेश कुलकर्णी यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.
सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 30/06/2025 रोजी शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समिती, सागोला या समितीचे पदाधिकारी नागपुर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी लागणारे
जमीनीचे भुसंपादना विरोधात रस्ता रोको करणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती, मा.जिल्हादंडाधिकारी यांनी त्याचेकडील जावक क्रमांक 2025/डिसीबी-2/आर.
आर.-3875 दिनाक 27/06/2025 अन्वये संपुर्ण सोलापुर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37(1) चा आदेश जारी केल्यामुळे आम्ही संबंधीत पदाधिकारी व शेतकरी यांना दिनांक 30/06/2025 रोजी भारतीय
नागरीक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 168 प्रमाणे नोटीस देवुन कायदेशीर व सनदशिर मार्गाचा आवलंब करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. दिनांक 01 जुलै 2025 रोजी मी पोलीस ठाणेस हजर असतांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,
मौजे अनकढाळ ता. सांगोला येथील सांगोला मिरज नॅशनल हायवे क्रमांक 166 वरील टोलनाक्या जवळ शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समिती, सांगोला या समितीचे पदाधिकारी व शेतकर्यांनी रास्ता रोको केला आहे. अशी माहिती मिळाल्याने
मी व सोबत श्रेणी पोसई बगाडे, पोहेकों देवकर, पोहेका बनसोडे, पोहेकों घुले, पोकॉ कांबळे असे सर्वजन सदर ठिकाणी रवाना झालो. मौजे अनकढाळ येथील नॅशनल हायवे क्रमाक 166 वरील टोलनाक्याजवळ शेतकरी संघर्ष समिती,
सांगोला या समितीचे पदाधिकारी व शेतकरी यांनी नागपुर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी लागणार्या जमीनीचे भुसंपादन रद्द करणे संदर्भात रस्ता रोको करून सांगोला-मिरज रोडवरुन जाणारे येणारे
वाहनांना मज्जाव करून रास्तारोको आंदोलन केले व त्या ठिकाणी शक्तिपीठ करीता जमीनीचे भुसंपादन रद्द करणे संदर्भाने सरकार विरोधात मोठमोठ्याने घोषणा देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
0 Comments