google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात 33 हजार 404 शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही अपूर्णच ; 15% लाभार्थी योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता 31 जुलै 2025 ई- केवायसीची अंतिम मुदत

Breaking News

सांगोला तालुक्यात 33 हजार 404 शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही अपूर्णच ; 15% लाभार्थी योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता 31 जुलै 2025 ई- केवायसीची अंतिम मुदत

सांगोला तालुक्यात 33 हजार 404 शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही अपूर्णच ;


15% लाभार्थी योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता 31 जुलै 2025  ई- केवायसीची अंतिम मुदत

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला /करण मोरे सांगोला तालुक्यातील शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या 33 हजार 404 शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची ई-केवायसी अद्यापही पूर्ण झालेली नाही अशी माहिती पुरवठा निरीक्षक अधिकारी प्रांजली गावडे यांनी दिली आहे.

तालुक्यात एकूण लाभार्थ्यांपैकी सुमारे 15% लाभार्थी ई-केवायसी न करताच प्रलंबित स्थितीत आहेत. यामुळे भविष्यात त्यांना अन्नसुरक्षा योजनांसह इतर शासकीय लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शिधापत्रिकाधारकांनी  प्रांजली गावडे यांनी केलेल्या आवाहनानुसार, ज्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही, 

त्यांनी येत्या दोन दिवसात आपल्या जवळच्या रास्तभाव धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, आधार कार्ड आणि अंगठ्याचे सत्यापन यावर आधारित आहे.

लाभ गमावू नका – ई-केवायसी लवकर करा!

पुरवठा विभागाकडून सातत्याने जनजागृती केली जात असून, लाभार्थ्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. 

वेळेवर ई-केवायसी पूर्ण केल्यास अन्नधान्य आणि इतर शासकीय सुविधा सुरळीतपणे मिळणार आहेत.तालुका प्रशासनाचे आवाहन उशीर न करता ई-केवायसी पूर्ण करा आणि आपण लाभा पासून दूर राहू नका .

चौकट: आपल्या रेशनकार्डची ई.केवायसी दोन प्रकारे करता येते. शासनाच्या अधिकृत ॲपद्वारे व जवळच्या रेशन दुकानामध्ये करता येते. ई. केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे. रेशनकार्डवर मिळणारे 

लाभ सुरू ठेवण्यासाठी ई. केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापुढे फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल .ई. केवायसी न केल्यास लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार नाही. रेशनकार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते. 

ई केवायसीसाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. आधारकार्ड रेशनकार्डशी लिंक असेल तरच ई केवायसी ऑनलाईन पूर्ण करता येते. रेशन कार्डधारकांनी तातडीने ई केवायसी पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 तालुक्यातील ई.केवायसी पूर्ण केलेल्या राशनकार्ड धारकांनी 31 जुलै पूर्वी ही ई. केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments