google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक प्रकार! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्.; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

Breaking News

संतापजनक प्रकार! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्.; अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

संतापजनक प्रकार! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हात-पाय दाबायला सांगत धरले हाताला अन्.;


अत्याचारित मुलीला मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने मिळवून दिला न्याय

एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर स्वतः वडीलांनीच अत्याचार केल्याची घटना घडली असून ही घटना मोहोळ तालुक्यातील आहे. 

अत्याचारित मुलगी रात्री ८.३० ला मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये येवून घटना कथन करताच मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेवून फिर्याद दाखल केली

व शून्य क्रमांकाने कामती पोलिस स्टेशनला वर्ग करून सदर पिडीत मुलीला कामती येथे रात्री शासकीय वाहनाने पोहच केल्याने त्या पिडितेला न्याय मिळाल्याने मंगळवेढा पोलिसांचे कामकाजाबाबत कौतुक होत आहे.

या घटनेची हकीकत अशी की, सदर पिडीत मुलगी ही मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागात राहावयास असून हिच्या आईचे वडीलांबरोबर पटत नसल्यामुळे ती वडीलापासून गेली १० वर्षापासून विभक्त माहेरी मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात रहावयास आहे.

दि.१९ जून रोजी सायं. ५.३० वाजता यातील पिडीत मुलीचे वडील घरी होते तर तिचे आजोबा एका कारखान्यात कामावर गेले होते.

 ही संधी साधून आरोपी वडीलाने मुलीस नवीन तुला ड्रेस आणला आहे, तो मला घालून दाखव असे नाटक केले. त्या पिडीत मुलीने नवीन कपडे घातले नाहीत.

आरोपी तथा वडीलाने घराच्या दाराला कडी लावून आंथरून टाकून हात पाय दाबण्याचा बहाणा केला. त्यावेळी पिडीतेने वडीलाचा शब्द प्रमाणित मानून पाय दाबण्याची सेवा करत असताना 

आरोपीने तिच्या हाताला धरून जवळ ओढून चुंबन घेतले व अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.

यावेळी पिडीतेने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आरोपीच्या हाताला चावा घेतला. मात्र पिडीत मुलीपेक्षा आरोपीची ताकद जास्त असल्याने त्याने तिला सोडले नाही. तदनंतर या घटनेबाबत तु कोणाला काही सांगू नकोस 

असा दमही दिला. यावेळी पिडीतेने आरोपीस जोरात ढकलून सुटका करून घेतली व कपडे घालून दाराची कडी काढून बाहेर पळत येवून बाहेरून दरवाजाला कडी लावली.

तदनंतर पिडीतेने मदतीसाठी बाहेर हाका मारल्या मात्र तिच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. या दरम्यान पिडीता बाहेरच अंधारात बसून राहिली. 

रात्री ९ वाजता तिचे आजोबा कामावरून घरी आले. दि.२० जून रोजी पिडीतेने मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात राहात असलेल्या आईला फोन करून घडलेली हकीकत कथन केली.

यावेळी आईने तिला मंगळवेढ्याकडे येण्याचा सल्ला दिला. सायं. ६ वाजता ती तिथून मिळेल त्या वाहनाने मंगळवेढा बस स्टँडवर रात्री ८ वाजता आली.

 त्यावेळी आई पण येथे पोहचली होती. पिडीत मुलगी व तिची आई पोलिस स्टेशनला येवून सदर घटनेची हकीकत पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना कथन केली.

या घटनेची पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती देताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विक्रांत गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर, निर्भया पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण,

 पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे आदिंच्या पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मंगळवेढा पोलिस ठाण्यात वडीलाविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

तसेच कामती पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याशी संपर्क साधून आरोपीला ताब्यात घेण्याच्या सुचना करून सदर गुन्हा कामती पोलिस स्टेशनला वर्ग केला. 

रात्रीची वेळ लक्षात घेवून पोलिस पथकाने पिडीत मुलीची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी शासकीय पोलिस गाडीने कामती येथे पोहच करण्यात आले.

 दरम्यान मंगळवेढा पोलिसानी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments