google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

Breaking News

दुर्दैवी घटना! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

दुर्दैवी घटना! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा


मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना 

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील (ता. मंगळवेढा) झारेवाडीमध्ये हॉटेलसाठी लागणारी शेव घरी तयार करताना गॅसचा स्फोट होऊन दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाला.

 तर आई-वडील, एक बहिण आणि चुलती गंभीर भाजले. बुधवारी दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना घडली.

दोन वर्षाची चिमुरडी श्रेया दादासो गंगथडे आणि ३ वर्षाची स्वरा यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे आई-वडील 

मोनाली दादासो गंगथडे (वय ३८), दादासो विष्णू गंगथडे (वय ४५), एक मोठी बहिण (अनुजा वय ५) आणि चुलती सुनिता राहुल गंगथडे (वय ३३ रा) गंभीररित्या भाजले.

नंदेश्वर गावापासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या झारेवाडी येथील दादासो विष्णू गंगथडे यांचे शिरशी येथे हॉटेल आहे. दादासो आजारी असल्यामुळे दोन ते तीन दिवसापासून हॉटेल बंद होते.

हॉटेल उघडण्यासाठी तयारी म्हणून गॅसवर चिवडा केला. शेव करताना अचानक गॅसचा पाईप लिक होऊन स्फोट झाला. त्यामध्ये चिमुरडी श्रेया व स्वरा गंभीररित्या भाजल्याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मोठी बहिण, आई, वडील, चुलती हे गंभीरित्या जखमी झाले. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.

रात्री उशिरा सोलापूर ग्रामीणची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा उलगडा फॉरेन्सिकचा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

0 Comments