google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त न केल्यास मनसे आंदोलन करणार जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर

Breaking News

सांगोला शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त न केल्यास मनसे आंदोलन करणार जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर

सांगोला शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त न केल्यास मनसे आंदोलन करणार जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरांमध्ये भुयारी गटार योजनेअंतर्गत साधारण एक वर्ष झाले काम चालू आहे सदर कामातील भ्रष्टाचाराबाबत सांगोला शहरातील विविध नागरिकांनी व संघटनांनी आवाज उठवला आहे

 परंतु त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे संबंधित ठेकेदाराची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे सदर कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले

 परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सहन करणार नाही सदर कामानिमित्त शहरातील विविध भागात खोदकाम करण्यात आले काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर जेसीबीच्या साह्याने ओबडधोबड स्वरूपात मुरूम टाकण्यात आला 

पण तो रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक व त्रासदायक करून ठेवला आहे आज शहरांमध्ये संपूर्ण धुळीचे साम्राज्य पसरले आहे शहरातील एकही रस्ता वाहतुकीच्या लायकीचा राहिलेला नाही 

सदर रस्त्यामुळे वाहन चालवणे धोकादायक झाले आहे कित्येक लोकांचे अपघात झाले आहेत ज्याच्यामुळे ते कायमस्वरूपी जाय बंद झाले आहेत सुदैवाने आजपर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही

 कदाचित प्रशासन व ठेकेदार कोणाचा तरी जीव जाण्याची वाट पाहत आहेत काय असे वाटते त्यामुळे प्रशासन व मुजोर ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केले आहे संबंधित विभागाकडे चौकशी केली असता नागरिकांची कोणतीही तक्रार नाही असे सांगण्यात आले

 परंतु जे नागरिक तक्रार करतात त्यांना उडवा उडवीची उत्तरे देऊन मार्गस्थ केले जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापी सहन करणार नाही सांगोला शहरातील सर्व रस्ते किमान व्यवस्थित वाहन चालवण्यासारखे केलेच पाहिजे 

अशी मागणी करत आहे पुढील काही काळात हिंदू धर्मियांचे उत्सव सुरू होतात त्यामध्ये गणेशोत्सव नवरात्री दिवाळी याप्रमाणे तसेच साधारण याच काळात या भागांमध्ये पावसाचे आगमन होते

 त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या  सोयी सुविधांसाठी शहरातील काम झालेल्या ठिकाणी चे रस्ते किमान वाहन चालवण्या पुरते दुरुस्त करण्यात यावे जोपर्यंत रस्ते दुरुस्त होत नाहीत

 तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे कोणतेही बिल देयक देण्यात येऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोमवार दिनांक 30 जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा देत आहे तरी शहरातील सर्व नागरिकांनी या आंदोलनास पाठिंबा द्यावा 

अशी विनंती मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर यांनी केले आहे सदर निवेदन देतेवेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर स्वप्निल सावंत विठ्ठल शिंदे अविनाश बनसोडे श्रीधर घाडगे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments