म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडावे :- आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्याची मागणीचे पत्र जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी दिले आहे.
सांगोला तालुक्यातील सुमारे ३० ते ३५ गावे यात येत असून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीवर १९ बंधार्यांवर अवलंबून असणाऱ्या १९०० ते २००० हेक्टर जमिनीसाठी पाणीसाठा कमी क्षमतेने असल्याने
सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी तात्काळ सोडल्याने माण व कोरडा नदीवर अवलंबून असणारे १९ बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न याद्वारे तात्काळ मार्गी लागेल.
यासाठी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत पाणी सोडण्यात येवून सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात यावेत अशी मागणी
आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी केलेली असून मंत्री महोदयांनी यावर सकारात्मक दर्शविल्याचे आमदार डॅा.बाबसाहेब देशमुख यांनी सांगितले.
0 Comments