google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना.. बायकोला संपवले, बॉडी घेऊन बाईकवरच निघाला, रात्री दीडला चौकात पोहोचला अन्…

Breaking News

धक्कादायक घटना.. बायकोला संपवले, बॉडी घेऊन बाईकवरच निघाला, रात्री दीडला चौकात पोहोचला अन्…

धक्कादायक घटना.. बायकोला संपवले, बॉडी घेऊन बाईकवरच निघाला, रात्री दीडला चौकात पोहोचला अन्…


पुण्यात काल मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची ही घटना आहे.

 इतकेच नाही तर मध्यरात्री बाईकवरुन पत्नीचा मृतदेह घेऊन शहरात फिरत असल्यालेही क्रुर क्रत्य समोर आले आहे.

बुधवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. राकेश रामनायक निसार असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी बबिता राकेश निसार हिचा गळा आवळून खून केला. 

त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो चक्क बाईकवरुन तिचा मृतदेह घेऊन प्रवास करत होता.

 नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. भूमकर पुलाकडून राकेश बायकोचा मृतदेह घेवून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता. 

बाईकवरुन मृतदेह घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला आडवले. त्यानंतर त्याचे बिंग फुटले.

आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेशला बेड्या ठोकल्या आहेत. राकेशने पत्नीची हत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून राजेशची चौकशी केली आहे. 

त्याचबरोबर मोबाइल कॉल रेकॉर्ड आणि घरगुती संबंध याबाबींचाही तपास केला जात आहे. मात्र, पत्नीची हत्या करुन मृतदेह सार्वजनिक ठिकाणी नेण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments