google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मस्तवाल कर्मचारी! देवदर्शन करून घराकडे जाणाऱ्या कुटुंबीयांना सांगोला -अनकढाळ टोल नाक्यावर मारहाण; टोल नाक्याच्या मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा दाखल

Breaking News

मस्तवाल कर्मचारी! देवदर्शन करून घराकडे जाणाऱ्या कुटुंबीयांना सांगोला -अनकढाळ टोल नाक्यावर मारहाण; टोल नाक्याच्या मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा दाखल

मस्तवाल कर्मचारी! देवदर्शन करून घराकडे जाणाऱ्या कुटुंबीयांना सांगोला -अनकढाळ टोल नाक्यावर मारहाण; टोल नाक्याच्या मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा दाखल 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅनच्या कारणावरून टोल नाक्यावरील मॅनेजरसह आठ जणांनी मिळून देवदर्शन करून घराकडे परत जाणाऱ्या

 तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथील पती पत्नीसह त्यांच्या दोन मुलांना हाताने, रबरी पाईप, वायर, काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना मंगळवार ६ मे रोजी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास घडली.

याप्रकरणी हरिंदर प्रताप रेड्डी रा. एच. आर. कॉम्पलेक्स चिक्कडपल्ली हैद्राबाद यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनकढाळ टोलनाक्यावरील मॅनेजर सुजीत कुमार, 

अक्षय महादेव पाटील, विठ्ठल रामचंद्र खांडेकर, संजय सिताराम बंडगर उर्फ गांधी, अमोल बाळासाहेब बंडगर व अज्ञात तीन इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिंदर प्रताप रेड्डी हे पत्नी चैतन्या, मुलगा श्रीश्वर, श्रीमान महादेव व चालक चंदर रामया नागीनी (रा. अमरपेठ हैद्रबाद) असे मिळून टी. एस. ०७/ई.ई. ६११६ या वाहनातून कर्नाटक राज्यातील गोकर्ण येथे देव दर्शनासाठी गेले होते.

६ मे रोजी सकाळी कोल्हापुर येथे महालक्ष्मीचे देवदर्शन करून पंढरपूरकडे जात होते. रात्री ९.३० ते १० च्या सुमारास अनकढाळ टोलनाका येथे आले असता टोलनाक्यावर रेड्डी यांच्या गाडीचे फास्ट टॅग स्कॅन झाले नाही. त्यानंतर सदरचा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.

रेड्डी व त्यांचा दुसरा मुलगा श्रीश्वर असे गाडीतुन उतरून मारहाण करणाऱ्या लोकांना सोडवत होते. त्यावेळी सुमारे सात ते आठ लोकांनी रेड्डी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना रबरी पाईप, वायर, काठीने पाठीवर पायावर, डोकीत, कानावर तोंडावर मारहाण करून जखमी केले.

त्यातील काही लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळी केली. त्यावेळी भांडण बघून रेड्डी यांची पत्नी चैतन्या ही त्यांना सॉरी सॉरी असे म्हणून मारहाण करु नका असे म्हणत होती. त्यावेळी त्यांनाही काही इसमांनी हातावर पाईपने मारहाण केली.

त्यानंतर त्या लोकांनी गाडीच्या काचा व मोबाईल फोडून नुकसान केले आहे असे हरिंदर प्रताप रेड्डी यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

गाडी नंबर स्कॅन करण्यासाठी सांगितले असता दिली शिवी

टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याने तुमच्या गाडीचे स्कॅन होत नाही, तुम्ही पैसे भरा असे सांगितले. यावर रेड्डी यांनी माझ्या गाडीचे नंबरवर स्कॅन करा असे सांगितले असता त्याने रागाने शिवी दिली.

 त्यावेळी रेड्डी यांचा मुलगा श्रीमान महादेव हा गाडीतून उतरून टोलनाक्यावरील कर्मचारी यास तुम्ही शिवी देवु नका असे म्हणाला. त्यावेळी त्याने इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन रेड्डी कुटुंबियांना हाताने मारहाण केली.

Post a Comment

0 Comments