google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी विनोद घुगे यांची नेमणूक

Breaking News

सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी विनोद घुगे यांची नेमणूक

सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी विनोद घुगे यांची नेमणूक 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

 सांगोला पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांची सोलापूर नियंत्रण कक्ष विभागासाठी विनंती बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी यापूर्वी पंढरपूर वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर मोहळ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक त्यानंतर 

करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. आता त्यांच्याकडे सांगोला पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

२३ जानेवारी २०२४ रोजी पो.नि. भिमराव खणदाळे यांनी सांगोला पोलीस स्टेशन चा पदभार घेतला होता. 

१५ महिने त्यांच्याकडे पदभार राहिला आहे. त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात तडीपारची तसेच ४ वाळू तस्करांना हद्दपारची कारवाई केली आहे.

 कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत त्यांनी क्राईम रेट कमी आणण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडे आता सोलापूर नियंत्रण कक्ष विभागाची जबाबदारी राहणार आहे.

Post a Comment

0 Comments