धक्कादायक ! सोलापुरमध्ये दुषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू
सोलापूर : पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असताना आता सोलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
यामध्ये दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला आहे तर एकीची प्रकृती गंभीर आहे.
भाग्यश्री म्हेत्रे (वय १६), जिया महादेव म्हेत्रे ( वय १६) अशी मृत मुलींची नावे आहेत. सोलापुरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत
असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नागरिकांनी केला. तसेच स्थानिकांच्या आरोपाला भाजप आमदार देवेंद्र कुठे यांनीही पुष्टी दिली आहे.
दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आयुक्तांकडून कारवाई करण्यात येईल.
या मुलींच्या मृत्यूची बातमी समजताच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सदर मुलीच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मुलींच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
0 Comments