google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील वासुद गांवचे श्री.आनंदराव केदार सर व सौ. सुवर्णा केदार हे "राज्यस्तरीय आदर्श माता-पिता" पुरस्काराने सन्मानित

Breaking News

सांगोला तालुक्यातील वासुद गांवचे श्री.आनंदराव केदार सर व सौ. सुवर्णा केदार हे "राज्यस्तरीय आदर्श माता-पिता" पुरस्काराने सन्मानित

सांगोला तालुक्यातील वासुद गांवचे श्री.आनंदराव केदार सर व


सौ. सुवर्णा केदार हे "राज्यस्तरीय आदर्श माता-पिता"  पुरस्काराने सन्मानित

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी: वासुद गावचे सुपुत्र श्री आनंदराव गणपती केदार यांचा जन्म सांगोला सारख्या दुष्काळी भागामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये मु. पो.वासुद-अकोला या गावी १९५६ साली झाला. 

दुष्काळी ग्रामीण भागामध्ये त्यावेळी उदरनिर्वाहासाठी शेती हे एकमेव साधन. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले.

 त्यानंतर त्यांच्या मातोश्री कै. नर्मदा गणपती केदार यांनी  खडतर परिस्थितीला सामोरे जात अत्यंत हलाखीची परिस्थिती मध्ये त्यांचा सांभाळ केला. यानंतर श्री आनंदराव केदार सर यांनी कठोर परिश्रम,जिद्द,

चिकाटी, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारे कठीण काळामध्ये आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांचे चुलते श्री. भगवान सोपान केदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले माध्यमिक पदवी पदव्युत्तर उच्च शिक्षण पूर्ण केले.

श्री केदार सर यांनी आपला शैक्षणिक प्रवास सुरू ठेवून रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून ते रुजू झाले. यानंतर त्यांचा विवाह कै. विनायक भानुदास मिसाळ गुरुजी , वाटंबरे यांची कन्या सौ सुवर्णा यांच्याशी झाला.

 श्री.आनंदराव केदार सर व सौ.सुवर्णा केदार यांनी आपला संसार अतिशय कष्टाने फुलवला. शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर या जोडप्याने आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत सर्व संकटांना निर्भीडपणे सामोरे जात आपली मुलांना चांगले शिक्षण मिळावे

 यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले, याच कष्टाचं फळ म्हणून सौ सुवर्णा व श्री आनंदराव केदार सर यांचा मोठा मुलगा श्री.दीपक केदार  व सुन सौ.सायली केदार हे उच्च विद्या विभूषित झालेले

 असून भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून प्रमोशन द्वारे सध्या ते परदेशामध्ये युनायटेड किंगडम(UK)- लंडन येथे चीफ इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे दुसरे चिरंजीव 

डॉ.निरंजन केदार एम.डी.मेडिसिन व सून डॉ.दिव्यता केदार एम.एस. स्त्रीरोगतज्ञ असून डॉ.दिव्यता यांना वैद्यकीय क्षेत्रामधील आदर्श सेवा रत्न पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर दांपत्याचे वैद्यकीय ,सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे 

तसेच माणुसकीच्या भावनेने आणि सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून ते वैद्यकीय सेवा देत आहेत.केदार सरांचा धाकटा मुलगा श्री.चित्तरंजन केदार व सून सौ.कांचन केदार हे औषध निर्माण 

शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केलेली असून सध्या फार्मासिस्ट , प्रोफेसर या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांची नुकतीच छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे डॉक्टरेट पदवी साठी निवड झाली आहे.

अश्या प्रकारे आपल्या आई-वडील यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कुटुंबातील सदस्य विभिन्न क्षेत्रामध्ये इंजीनियरिंग ,मेडिकल व औषध निर्माण या क्षेत्रांमध्ये दैदीप्यमान कामगिरी करत आहेत.

शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर खडतर परिस्थितीवर विजय मिळवत समाजापुढे अनोखा आदर्श निर्माण करणाऱ्या सौ.सुवर्णा व श्री आनंदराव केदार सर यांना आय.एस.ओ. मानांकन प्राप्त महाराष्ट्रातील निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ

 दै. तुफान क्रांती यांच्या वतीने "राज्यस्तरीय आदर्श माता- पिता" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.त्याबद्दल सौ.सुवर्णा व श्री.आनंदराव केदार सर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व भावी आरोग्यपूर्ण वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments