ब्रेकिंग न्यूज..मजूर आई-वडिलांचा मुलगा दुसऱ्यांदा अधिकारी: तिसंगीचा अजय सरवदे आयपीएस; बहिणीचेही अधिकारी होण्याचे स्वप्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पंढरपूर : दुसऱ्याच्या रानात कामाला जाऊन अजयला शिकवलं त्याच पांग फेडून अजयने दुसऱ्यांदा अधिकारी होऊन आमचं आई-बापाचं नाव रोशन केलं.
अशी भावना तिसंगी येथील अजय सरवदे यांच्या आईने व्यक्त केली.
तिसंगी (ता. पंढरपूर) येथील अजय नामदेव सरवदे हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ग्रामीण भागातून अजय सरवदे आयपीएस आधिकारीपदी निवड झाली आहे.
यूपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल नुकताच लागला. अजय सरवदे हा ८५८ वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
अजयच्या वडिलांचे शिक्षण नववी तर आई अडाणी आहे. अजयच प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसंगी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले.
अजय हे असिस्टंट स्पोर्ट अॅथॉरिटी ऑफ डायरेक्टर ऑफिसर, भोपाळ येथे कार्यरत आहेत. दुसऱ्यांदा यूपीएससी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रशांतराव परिचारक, रामेश्वर कारंडे, अर्जुन खरात, अविनाश रूपनर, बालाजी पाटील आदींसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
मी व माझी पत्नी सारिका दोघेही लोकांकडे मोल-मजुरी करायचो, आमची गरिबी होती. कष्ट केल्याशिवाय अन्न मिळत नव्हते.
यातून दोन मुलाच शिक्षण केले. मुलगा अजय मोठा अधिकारी झाला याचा अभिमान आहे. मुलगी कांचन पण एमपीएससी करते आहे.
- नामदेव सरवदे, अजयचे वडील
0 Comments