google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बायकोनंच रचला खतरनाक प्लान! उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा कट; महाराष्ट्र हादरवणारी घटना

Breaking News

बायकोनंच रचला खतरनाक प्लान! उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा कट; महाराष्ट्र हादरवणारी घटना

बायकोनंच रचला खतरनाक प्लान! उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा कट;


महाराष्ट्र हादरवणारी घटना 

छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. 

पत्नीने आई, भाऊ, घरातील मोलकरीण आणि मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

देवेंद्र कटके असं उपजिल्हाधिकारी यांचं नाव असून जादूटोणा करून विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एवढेच नाहीतर, बंदूक रोखून देवेंद्र कटके यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या प्रकरणी सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, पतीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पत्नी सारिका हिने आपल्या कुटुंबीयांसह कट रचून विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर आणि हत्येचा प्रयत्न केला.

पत्नीच्या मित्राने केंब्रिज चौकात पिस्तूल रोखले, असा आरोप त्यांनी केला आहे. कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी, तिचा मित्र विनोद उबाळे आणि भाऊ आतिष देशमुख यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र कटके यांनी सारिका हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसातच सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला.

मात्र, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झाला. त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत 

हे लक्षात येताच तिचं वर्तन बदललं. जातिवाचक बोलून ‘आडवा आलास तर उडवून टाकील,’ अशी धमकी दिली होती.

तसेच घरी सारिकाने जातीवाचक शिवीगाळ केली. घरातील नोकरांसमोरच, ‘तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेस,’ 

असं बोलून अपमान केला. ‘काय व्हायचे ते होऊ दे, रक्तपात झाला तरी चालेल,’ अशा धमक्या दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments