धक्कादायक !अनैतिक संबंधातून पती, महिलेचा दीर यांनी केली प्रियकराची निर्घृण हत्या;
पती, दीरावर गुन्हा, दोघांनाही केली अटक मंगळवेढा तालुक्यातील घटना..
मंगळवेढा :-पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून पती, महिलेचा दीर यांनी प्रियकराचा काठीने डोकीत मानेवर तसेच सर्वांगावर मारून जखमी करून तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सागर मनोहर इंगोले (वय २९) याचा खून केला.
याप्रकरणी सुभाष होनमुखे व संजय होनमुखे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक केली आहे.
फिर्याद मृताचे वडील मनोहर इंगोले (रा. सलगर बुद्रुक) यांनी दिली आहे. ही घटना शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मारोळी गावातील होनमुखे वस्तीजवळ घडली.
याबाबत माहिती अशी, फिर्यादी मनोहर इंगोले यांच्या मुलाचे सलगर बुद्रुक येथे मोबाइल शॉपीचे दुकान असून, मोबाइल रिचार्ज व मोबाइल रिपेअर करण्यासाठी आरोपीची पत्नी येत होती.
फिर्यादी शनिवारी सकाळी ६ वाजता दूध घालण्यासाठी गेले असता त्यावेळी गावातील बंडू जाधव याच्याकडून समजले की,
फिर्यादी चा मुलगा सागर इंगोले यास सुभाष होनमुखे, संजय हेनमुखे यांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांचे होनमुखे वस्तीजवळ मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी फिर्याद मनोहर इंगोले यांनी दिली.
0 Comments