आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजवले.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
प्रतिनिधी: नुकतेच विधानसभेचे अर्थसंक्लपीय अधिवेशन पार पडले.या अधिवेशनामध्ये सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी मतदार
संघाबरोबरीने राज्यातील महत्वपुर्ण प्रश्न उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधुन घेतले..तर काही महत्वाचे प्रश्नांची सोडवणुक करुन घेतली त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील बोगस डाॅक्टराची संख्या वाढत
असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणुन दिले.आशा बोगस डाॅक्टरांमुळे अनेक नागरीकांचे जिव धोक्यात येत आहेत .तरी आशा बोगस डाॅक्टरावरांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी आमदार साहेबांनी केली..
त्या प्रश्नावर उत्तर देताना वैद्यकिय शालेय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी उत्तरादाखल सांगितले की..जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय ,नगरपालीका व महानगर पालीका स्तरावर
जिल्हाधिकारी ,गटविकास अधिकारी,मुख्याधीकारी व मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली यापुर्वीच आशा बोगस डाॅकटरांची शोध समीती गठीत केलेली आहे.
आशा डाॅक्टरावरती कारवाई करण्यासाठीं जिल्हा दंडाधीकारी या़च्या आध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समीती गठीत केलेली आहे.. या समितीमार्फत आशा बोगस डाॅक्टरावर कारवाई करण्यात येईल.आसे मंत्री महोदयांनी सांगीतले.
आमदार साहेबांनी आणखी एक महत्वाचा विषय सभागृहाच्या पटलावर मांडला तो म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नसले बाबत.... आमदार साहेब म्हणाले की.सरकारने एक "राज्य एक गणवेश " या योजने अंतर्गत शैक्षणीक वर्षात
केंद्रीकृत पध्दतीने गणवेश दिले जातात.या गणवेश वाटपामध्ये अनेक तृटी आहेत.गणवेशाचा निकृष्ट दर्जा ,एकाच क़ंत्राट दाराला ठेका देणे,एकाच टेलरची निवड करणे,कमी
जास्त मोज माप ,गणवेश वेळेवर न मिळणे व काही भागातील विद्यार्थी गणवेशापासुन वंचीत असुन आदिवासी ,दुर्गम भागातील विद्यार्थी तर फाटके कपडे घालुन शाळेत येतात.या सर्व बाबींचा विचार करुन सरकारने उपाययोजना कराव्यात ...
आमदार साहेबांच्या या प्रश्नावरती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की..शालेय विद्यार्थांना दिले जाणारे दोन गणवेशा पैकी एक गणवेश महिला अर्थीक विकास महामंडळा मार्फत तर दुसरा गणवेश हा स्थानिक शालेय शिक्षण समीतीमार्फत देण्याचा निर्णय झालेला आहे.
४४,६०,००४ इतक्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो आहे.गणवेशाच्या बाबतच्या तृटी असतील तर त्याची सखोल चौकशी करुन सर्व विद्यार्थ्यांना चांगले गणवेश ते ही वेळेत दिले जातील असे सभागृहाला सांगीतले.
आमदार साहेबांनी आणखी एक महत्वाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला तो म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी ,मदतनिस यांचे थकीत मानधना बाबत ...
या योजने अंतर्गत जवळ पास दोन लाख कर्मचारी ,स्वयंपाकी व मदतनिस असुन त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असुन त्यांना देण्यात येणाऱ्या मान धनामध्ये देण्यात यावी तसा निर्णय २८ जुलै २०२४ च्या मंत्रीमंडळ बैठकीत झालेला आहे
तरी सरकारने यावर काय उपाययोजना केल्या आसा प्रश्न आमदार साहेबांनी उपस्थित केला...त्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री महोदय दादा भुसे साहेब म्हणाले की..या कर्मचाऱ्यांचे मानधन हे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे ठरवण्यात येते.
केंद्राचे ६०० रुपये व राज्याचे ४०० रुपये व अधिकचे राज्याचे १५०० रुपये आसे आपण २५०० रुपये देत आहोत हे मानधन पहाता या कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करण्याची मागणी राज्य सरकार केंद्र सरकारकडे करेल व कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जाईल
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दुध उत्पादकांच्या बाबतचा महत्त्वपुर्ण प्रश्न विचारत राज्यात दुध उत्पादकांची संख्या मोठी असुन,दुधाचे घसरलेले दर यांचा विचार करुन राज्य सरकार दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देते
व राज्यसरकारने आणखीन २ रुपयाची अनुदानात वाढ केल्याची घोषणा केली आहे,हे अनुदान कित्येक शेतकऱ्यांना आजही वेळेत मिळत नाही. व काहींना आजुन मिळण्यास अडचणी येत आहेत...
या प्रश्नावरती बोलताना मंत्री महोदयांनी सांगीतले की,दुधाला मिळणारे अनुदान हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असुन दुधाचे कोसळलेले दर पहाता वाढीव २ रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे..
ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसेल त्यांनी आपले आधार कार्ड ,संघाचे बॅंक खाते नाव,पशुधन टॅग क्रमांक अशी अचुक माहिती भरावी
अशी माहीती भरल्यास अनुदान मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही.ज्या दुध उत्पादकांची माहीती पुर्ण आहे..आशा दुध उत्पादक शेतकऱ्या़नी संघामार्फत सर्व माहीती भरुन घेण्याच्या सुचना संघाला देण्यात आल्या आहेत.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आणखी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला सांगोला,पंढरपुर,मंगळवेढा व सोलापुर जिल्ह्यातील सामाजीक वनीकरण विभागातील तात्कालीन
अधिकारी यांनी १०९ कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड होणे,३३ कोटी वृक्षलागडीचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन सोलापुर जिल्ह्यातील
सांगोला ,पंढरपुर,मंगळवेढा या तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली आहे त्याचे संगोपन न करता खाजगी वन रक्षक व इतरांच्या नावे खोटी बिले काढण्यात आली आहेत आशा अधिकाऱ्यांना व संबंधितांवरती काय कारवाई करणार असा प्रश्न विचारला..
त्यास उत्तर देताना मंत्री गणेश नाईक यांनी सांगीतले तात्कालीन वनक्षेत्रपाल श्रि किशोर अहिरे यांना निलंबित केले असुन इ १० पैकी ३ अधिकाऱ्यांचे चौकशी अहवाल पुणे विभागीय कार्यालयाकडे प्राप्त झाले असुन,ईतर ७ अधिकारी कर्मचारी यांचेही चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्याचे जाहीर केले.
आशा प्रकारे अनेक प्रश्न आमदार बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित केले त्यामध्ये सांगोला तालुक्यातील कडलास हद्दीतील माण नदीजवळ इंदापुर-विजापुर ९६५ जी या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेल्या कामामुळे या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत ते काम तबडतोड पुर्ण करावे..
राज्यातील वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण काढण्यात यावे व अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी...तसेच राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीत सापडलेला
असुन, कापसाचे घटलेले उत्पादन व बाजारातील घटलेल्या सुताच्या किंमती यामुळे सुतगीरण्या अडचणीत सापडल्या आहेत याचा विचार करुन सुतगिरण्यांना अर्थीक मदत करावी अशीही मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली.
तसेच भारतीय संविधानाचा गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयार संविधानाचे भारतीय नागरीकाप्रती महत्व व संविधान हे भारतीयांचा आत्मा कसा आहे
हे योग्य प्रकारे सभागृहात मांडले तसेच सांगोला शहरात विश्वरत्न पं.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उद्घघाटनाचे निमंत्रण सभागृहातच मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,उपमुख्य मंत्री
मा.एकनाथजी शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व मंत्री मंडळातील सदस्यांना व आमदारांना सभागृहातच निमंत्रण दिले तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर ,महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणीही सभागृहात केली.
आसे विविध विषय आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात मांडुन सभागृहात सांगोल्याचा आवाज पुंन्हा एकदा घुमवला असल्याची माहीती शेकापक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments