google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे जादूटोण्यासह अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस; कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

Breaking News

धक्कादायक प्रकार...सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे जादूटोण्यासह अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस; कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

धक्कादायक प्रकार...सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे जादूटोण्यासह अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस;


कडक कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- राज्यात अनेक ठिकाणी अघोरी विद्या अनेक वेगवेगळ्या कारणांनी केल्याच्या घटना घडत आहेत. अनेक भागात तर स्मशानभूमीत देखील हे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. 

सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथील स्मशानभूमीत दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जादूटोणाविरोधी कायद्यातील कलमानुसार असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांनी केली आहे. अघोरी कृत्य करून समस्या सोडवण्याचे खोटे आश्वासन देऊन अंधश्रद्धेचे प्रकार वाढू लागले आहेत. 

अमावस्येच्या मुहूर्तावर अंधश्रद्धेपोटी काही तांत्रिक मांत्रिक अघोरी उपचार करतात. असाच एक प्रकार सांगोला तालुक्यातील हलदहिवडी गावच्या स्मशानभूमीत सोमवार २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केल्याचे उघडकीस आले आहे.

त्याठिकाणी काळ्या कपड्यावर टाचण्या टोचलेल्या बाहुल्या, चक्री दाबन टाचण्या टोचलेले लिंबू, कव्हाळ, अंडी, बाहुल्या, हळद- कुंकू आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी शेळीच्या लहान पिल्लाचा (पाटरू) बळी दिला असल्याचे आढळून

 आल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी याचा शोध असा प्रकार करणाऱ्यावरती कडक कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments