खळबळजनक..सांगोल्यातील अधिकाऱ्यांवर वाढतोय राजकीय दबाव
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : सांगोला तालुक्यामध्ये सध्या विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे बदलीसाठी आग्रह धरलेला दिसत आहे.
अलीकडील काळातील वाढलेल्या राजकीय दबावापोटी अनेक अधिकारी या तालुक्यात आता नको रे बाबा, म्हणत गबाळ गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहेत.
लोकशाहीमध्ये प्रशासन हा महत्त्वाचा कणा असला तरी सद्यस्थितीला राजकीय दबावापोटी हा कणा हतबल आणि निराश्रयी बनलेला दिसतो आहे. एकेकाळी सांगोला तालुक्यात कार्य करण्यासाठी अधिकारी याठिकाणी येण्यास उत्सुक असायचे.अगदी
सांगोला तालुक्यात येण्यासाठी अधिकाऱ्यांची स्पर्धा सुरू असायची. पण विविध खात्याच्या अधिकारीवर्गात भीतीचे सावट पसरलेले दिसत आहे. मुळात सांगोला तालुक्यात पूर्वीपासून राजकारण करत असणारे
राजकारणी पुढारी यांनी कधीच अधिकारीवर्गावर दबाव आणला नाही. त्यांना दमदाटी केली नाही. पण अलीकडील काळात हा प्रकार वाढला असून कोण अधिकाऱ्यावर दबाव आणतय याची सुप्त चर्चा तालुक्यात सुरू आहे.
चुकीच्या लोकांच्या प्रवृत्तीचे आजपर्यंत तालुक्यातील कोणत्याच नेत्याने समर्थन केले नाही. असे असतानादेखील विनाकारण अधिकाऱ्यांना वेठीस धरून दबावाचे राजकारण केले जात आहे.
0 Comments