सरकारकडून मोठी घोषणा! लाडक्या बहिणींची चिंता मिटली; फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हफ्ता 'या' दिवशी जमा होणार
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं घवघवीत यश मिळवून दिलं होतं. गेल्या वर्षी जुलै 2024 पासून सुरु झालेल्या या योजनेच्या 7 हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली आहे.
त्यातच सरकारकडून 9 लाखांहून अधिक अपात्र महिलांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. अशातच फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये लाभार्थी महिलांना लाडक्या बहीण योजनेचे मिळालेले नाहीत. त्याचमुळे महिलांची धडधड वाढली असतानाच आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना महिला दिनाचं मोठं गिफ्ट देण्यात येणार आहे.कारण सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 1500 रुपयांचे दोन हप्ते सोबत मिळणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवाहफ्त होण्यापूर्वी सरकारच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं होतं. आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, 8 मार्चला महिला दिनानिमित्त महिलांसाठी या सभागृहात विशेष सत्र आयोजित केलं जाणार आहे. 8 तारखेला शनिवार असताना देखील हे सत्र आयोजित केलं आहे.
तसंच सर्वात लाडकी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हफ्ताचे पैसे महिलादिनाच्या पुर्वसंध्येला सर्व महिलांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
तर याबाबतची प्रक्रिया 5 ते 6 तारखेपासून सुरू केली जाईल आणि 8 तारखेआधी सर्व पैसे जमा होतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
संपूर्ण फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नाहीत. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु असल्यानं मिळाली नसल्याची माहिती आहे.
त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकाच वेळी मिळणार असल्याची चर्चा होती. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे मिळून असे एकूण 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लाडकी बहीण योजनेच्या आठव्या व नवव्या हफ्त्याविषयी मोठे संकेत दिले होते.यावेळी त्यांनी या अधिवेशनात राज्याचं बजेट अजितदादा मांडणार आहेत.
अतिशय चांगलं, अतिशय संतुलित अर्थसंकल्प आम्ही मांडू, जरी वेगवेगळ्या योजनांचा स्ट्रेस हा आमच्या बजेटवर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितलं होतं.
0 Comments