google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'तो' अपघात नव्हे खूनच..! चालकानेच घेतला बदला; हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर.

Breaking News

'तो' अपघात नव्हे खूनच..! चालकानेच घेतला बदला; हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर.

आग लावून बेशुद्धीचं नाटक, दवाखान्यातही बोलेना, पण पोलिसांनी दमात घेताच पोपटासारखं बोलू लागला!



'तो' अपघात नव्हे खूनच..! चालकानेच घेतला बदला; हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हलर भीषण आग दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर.

पुणे: हिंजवडीमध्ये बुधवारी (दि. २०) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या बारा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली.

या अपघातात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे.

दरम्यान, आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडीमधील ही घटना अपघात नसल्याचे उघड झाले आहे. टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने केमिकल आणून सीटखाली ठेवत 

भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक असलेला रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली. त्यानंतर केमिकलचा भडका उडाला. 

भडका उडण्यापूर्वी चालक गाडीतून उतरला होता. त्याचा दिवाळीत पगार कापला होता. तसेच गाडीतील सहकारी कर्मचाऱ्यांनी त्रास दिला होता

 म्हणून त्याने हे सर्व घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे. त्याचा तिघांशी वाद होता, त्यांना संपवायचे म्हणून त्याने हा प्रकार केला.

नेमकं काय घडलं होतं?

बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजता टेम्पो ट्रॅव्हलरला हिंजवडी फेज वनमध्ये निघाली असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली.

 ही बाब लक्षात आल्यानंतर चालक आणि समोरच्या सीटवरील कर्मचारी गाडीतून तात्काळ बाहेर पडले. 

मात्र, मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments