google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांचे वास्तव्य उघड;ॲडव्होकेट सचिन देशमुख यांची कारवाईची मागणी

Breaking News

सांगोला तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांचे वास्तव्य उघड;ॲडव्होकेट सचिन देशमुख यांची कारवाईची मागणी

सांगोला तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांचे वास्तव्य उघड;


ॲडव्होकेट सचिन देशमुख यांची कारवाईची मागणी

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांचे बेकायदेशीर वास्तव्य उघडकीस आले असून, या घुसखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ॲडव्होकेट सचिन देशमुख यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. 

यासंदर्भात त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले असून, या निवेदनात घुसखोरांच्या उपस्थितीमुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे नमूद केले आहे.

निवेदन देताना ॲडव्होकेट सचिन देशमुख यांच्यासोबत समाधान दिवसे, तानाजी टकले, विजय खरात आणि भूपेंद्र देशमुख उपस्थित होते.

निवेदनात ॲडव्होकेट देशमुख यांनी म्हटले आहे की, “सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांचे बेकायदेशीर वास्तव्य निदर्शनास येत आहे. या घुसखोरांच्या उपस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 या घुसखोरांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”

या घुसखोरांना तात्काळ त्यांच्या मायदेशी पाठवण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

पोलिसांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा ॲडव्होकेट देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments