सोलापूर ते मंगळवेढा महामार्गावर कारची ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक; सांगोल्यातील एक ठार, एक जखमी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर:- ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरला मागून कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना
सोलापूर ते मंगळवेढा महामार्गावर सोहाळे, गावच्या हद्दीत घडली. सत्याप्पा बसाप्पा डुम (वय 54, रा.दत्त नगर वासूद रोड, सांगोला) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हे खासगी कामासाठी कुमार शंकर माळी
(रा. माळवाडी, ता. सांगोला) यांच्यासह कारने सोलापूर येथे गेले होते. दरम्यान रात्री 11 च्या सुमारास सोलापूर ते मंगळवेढा महामागर्शावरुन सांगोला येथे जात असताना मोहोळ तालुक्यातील सोहाळे
गावच्या शिवारात कार चालक कुमार माळी याचा कारवरील ताबा सुटल्याने सदरची कार सोलापूर ते मंगळवेढा जात असलेला ऊस वाहतूकीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराने जाऊन धडकली.
या अपघातातील सत्याप्पा डुम व कारचालक कुमार माळी या दोन्ही जखमींना तात्काळ सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असता सत्याप्पा डुम यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
या अपघात प्रकरणी मृत सत्याप्पा डूम यांचा मुलगा बसवराज सत्याप्पा डुम याने कारचालक कुमार माळी यांच्या विरोधात कामती पोलीस ठाण्यात अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


0 Comments