सांगोला नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम, बचत गटातील महिलांसाठी अभ्यासदौऱ्याचे केले यशस्वी आयोजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गट, पथविक्रेते, युवक, असंघटित कामगार, धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती इ . यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न नगरपरिषदेच्या माध्यमातून केले जातात.
याचाच एक भाग म्हणून डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद, सांगोला यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेच्या वतीने
दिनांक 27 व 28 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय निवासी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये शहरातील विविध बचत गटातील 50 महिलां सहभागी झाल्या होत्या. या अभ्यास दौऱ्याच्या
पहिल्या दिवशी सांगली येथील बचत गटातील महिलांच्या माध्यमातून सुरु केलेल्या काजू प्रक्रिया उद्योग व पाणीपुरी उद्योग यांना भेट देण्यात आली. तसेच इचलकरंजी येथील ब्लू स्टार मशिनरी शोरुम या ठिकाणी गृह उद्योगांमध्ये उपयोगी पडणाऱ्या विविध मशीनची पाहणी
व माहिती बचत गटातील महिलांनी घेतली. यानंतर 28 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी येथील नगर परिषदेने बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या करिता
शहरांमध्ये सोनचिरीया शहर उपजीविका केंद्राची सुरुवात केली आहे. यामध्ये शहरातील विविध सेवांची माहिती व बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री केली जाते. या केंद्रास भेट देण्यात आली.
यावेळी बचत गटातील महिलांनी अभ्यास दौरयास उस्फूर्त असा प्रतिसाद देत सर्व उद्योग व्यवसायची सविस्तर माहिती घेतली. या अभ्यास दौरयामध्ये शहर स्तर संघाच्या अध्यक्षा सौ. सुनंद घोंगडे, सचिव सौ.मनिषा हुडेकरी व बचत गटातील 50 महिलांनी सहभाग नोंदविला.
सदरील अभ्यास दौरयाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री सचिन पाडे, कार्यालयीन अधिक्षक, श्री योगेश गंगाधरे, सहा. प्रकल्प अधिकारी, बिराप्पा हाक्के व शहर उपजीविका केंद्राचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध यशस्वी गृह उद्योग प्रकल्पास भेट देऊन माहिती घेता आली. या अभ्यास दौऱ्याचे फलित म्हणजे सांगली येथे अभ्यास दौऱ्यादरम्यान गुरुकृपा बचत गटाने चकली व कुरडई मशीन बुक केली.
यापुढेही विविध योजनांच्या माध्यमातून शहरातील महिला,युवक,पथ विक्रेते, असंघटित कामगार, धोकादायक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती यांची उपजीविका वाढविण्याकरिता नगरपरिषद कटीबद्ध राहील.
- डॉ सुधीर गवळी
मुख्याधिकारी तथा प्रशासक
नगरपरिषद सांगोला
0 Comments