सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी ! खेळता, खेळता झाडाला बांधलेल्या
झोक्याच्या दोरीचा गळ्याला फास आवळला; आई-वडिलांसमोर ८ वर्षीय मुलीचा मृत्यू
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
खेळता, खेळता करंजीच्या झाडाला बांधलेल्या झोक्याच्या दोरीचा गळ्याला फास आवळल्याने ८ वर्षीय मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
ही रविवारी (दि. २) दुपारी अडीचच्या सुमारास राजुरी (ता. सांगोला) येथे घडली. ऋत्विका भीमराव डोरले असे मृत मुलीचे नाव आहे.
याबाबत, वडील भीमराव अण्णा डोरले यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी रविवारी दुपारी २ च्या सुमारास पती-पत्नी घरात होते तर मुले मेहुणे आप्पासो व्हळगळ यांच्या घराजवळ असलेल्या करंजीच्या झाडाखाली खेळत होते.
अचानक दुपारी अडीचच्या सुमारास मुले खेळत असलेल्या करंजीच्या झाडाकडून ओरडण्याचा आवाज आल्याने पती-पत्नीने झाडाकडे धाव घेतली असता मुलगी ऋत्विका झाडाला बांधलेल्या झोक्याच्या दोरीने तिच्या गळ्याला फास आवळल्याने त्यात ती अडकली होती.
वडिलांनी पिरगळा काढून तिला बाजूला काढले असता तीची काहीच हालचाल होत नव्हती म्हणून नातेवाईकांनी खासगी वाहनाने तिला सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
0 Comments