मोठी बातमी! राज्य सरकारची 'आनंदाचा शिधा' योजना बंद तिजोरीवरील आर्थिक भार
वाढल्याने योजना बंद, शिंदे सरकारच्या योजनांना फडणवीसांचा ब्रेक
मुंबई – लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरील ताण वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने अनेक योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुती सरकारने २०२२ मध्ये सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आनंदाचा शिधा या योजनेत गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून 100 रुपयात एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ आणि एक किलो साखर दिली जात असे.
यामुळे गरीब कुटुंबे सण आनंदाने साजरा करत होते, मात्र आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो गोरगरिब कुटुंबांना फटका बसणार आहे.
त्यामुळे आता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही. जवळपास १ कोटी ६० लाख पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा दिला जात होता. यासाठी प्रत्येक सणाला ३५० कोटींचा खर्च येत होता. मात्रा आता या योजनेला अखेर ब्रेक लागला आहे.
राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे आता यंदाच्या गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून माफक दरात दिल्या जाणाऱ्या वस्तू यापुढे जनतेला बाजारभावानेच खरेदी कराव्या लागणार आहेत.
राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. लवकरच ही रक्कम २१०० रुपये केली जाणार आहे.
त्यामुळे तिकडल्या निधीची पूर्तता करण्यासाठी ही योजना बंद केली आहे का? अशी चर्चा रंगली आहे. तसेच सरकार आगामी काळात अनेक योजना बंद करणार असल्याचे बोलले जात आहे.
0 Comments