google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण अपघात..सांगोला महामार्गावर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे ठार

Breaking News

भीषण अपघात..सांगोला महामार्गावर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे ठार

भीषण अपघात..सांगोला महामार्गावर ट्रक-दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दोघे ठार 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जत : सांगोला महामार्गावर जतपासून चार किलोमीटर अंतरावर ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात

 दुचाकीवरील देवदत्त दिलीप शिंदे (वय २०) व यशराज नाना शिंदे (वय १५, दोघे रा.शेगाव, ता. जत) हे दोघेजण ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

अपघातात मृत झालेला देवदत्त शिंदे हा तरूण चालक म्हणून काम करीत होता. तर यशराज हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. दोघेही शेगावमध्ये राहत होते. 

सोमवारी सकाळी दोघेजण दुचाकीवरून शेगाववरून जतकडे निघाले होते. जतपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सागर बाहुबली कापड दुकानाजवळ आले 

असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यशराज हा जागीच मृत झाला. गंभीर जखमी देवदत्तला जत ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र त्याचाही मृत झाला.

अपघातात दुचाकी ट्रकमध्ये घुसून चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक थांबवून तेथून पळ काढला. जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 पंचनामा करून मृत यशराजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात आणला. अपघातात दोघे युवक मृत झाल्यामुळे शेगाव गावावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments