google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..सांगोला तालुक्यातील य. मंगेवाडी येथे सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

Breaking News

खळबळजनक..सांगोला तालुक्यातील य. मंगेवाडी येथे सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

खळबळजनक..सांगोला तालुक्यातील य. मंगेवाडी येथे सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सध्या अनेक भागातील ग्रामपंचायतीवर अविश्वास ठराव होत आहे. सांगोला तालुक्यातील यं. मगेवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी २१ फेब्रुवारी रोजी अविश्वास ठराव दाखल

 करून काल २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये सरपंचाच्या विरुध्द ११ सदस्यांपैकी ९ सदस्यांनी मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे विद्यमान सरपंच यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे.

  य.मंगेवाडी गावच्या ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्याने काल गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ( य. मंगेवाडी येथे विशेष सभा बोलविण्यात आली होती. 

या सभेस सी. प्रीती जावीर,  सौ. शैला येलपले, श्री. अनिल पाटील, सौ.सुप्रिया पाटील, सौ.मुक्ताबाई चोरमले, सौ. शितल भडंगे, अमोल चौगुले, कैलास येलपले, सौ. मनीषा घाटुळे, सौ. विमल खरात, सौ. नंदा चोरमले आदी सदस्य उपस्थित होते.

२१ फेब्रुवारी २०२५ रोजी सदस्या सौ. नंदा चोरमले व इतर ७ सदस्यांनी विद्यमान सरपंच यांचे विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. सभेच्या प्रारंभी शैला येलपले यांनी सरपंच अविश्वासाचा ठराव मांडला त्यास सुप्रिया पाटील यांनी अनुमोदन दिले.

 सभेत सौ. नंदा चोरमले व इतर ७ सदस्यांनी अविश्वासाच्या ठरावाच्या नोटीसीमध्ये जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याशी कायम असल्याचे सांगितले. 

त्यानंतर सदस्यापैकी सौ.शैला येलपले यांनी अविश्वास प्रस्तावाचे समर्पन करत असल्याचे सांगितले. त्यानंतर सदस्य अमोल चौगुले यांनी अविश्वास ठराव मान्य नसल्याचे सांगितले.

त्यामुळे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. मतदान घेऊन सर्व समक्ष मतमोजणी केली असता सरपंच अविश्वास ठरावाच्या बाजूने ९ मते पडली तर विरोधात म्हणजे सरपंच अविश्वास ठरावाच्या विरोधात २ मते पडली. 

त्यामुळे सरपंच अविश्वास ठरावाच्या बाजूने ९ मते पडली असल्याने ९ विरुध्द २ मतांनी ठराव मंजूर झाल्याचे जाहीर करण्यात आले. सभेचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments