माण व कोरडा नदीवरील बंधारे , सोनके तलाव तसेच कटफळ तलाव भरुन घेण्याची आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांची मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला -(प्रतिनिधी)- टेंभु-म्हैसाळचे आवर्तन चालु करुन माण व कोरडा नदीवरील बंधारे भरुन घ्यावेत तसेच नीरा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरु करुन सोनके तलाव भरुन घ्यावा
राजेवाडी प्रकल्पातुन कटफळ तलावात पाणी सोडण्याची मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील साहेब यांची भेट घेतली.
यावेळी मंत्री महोदयांना टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे लवकरात लवकर भरून घ्यावेत त्याचबरोबर नीरा उजवा कालव्याचे सन २०२४-२५ चे उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात येवून
सोनके तलाव भरण्यात यावा आणि म्हसवड ( राजेवाडी ) या मध्यम प्रकल्प योजनेतून कटफळ तलावात पाणी सोडण्यात येवून आगामी उन्हाळी आवर्तन मिळावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी मंत्री महोदयांनी यावर सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली
0 Comments