google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..काळेवाडी जवळ अपघातात घोड्यासह सांगोला तालुक्यातील एकजण जागीच ठार

Breaking News

धक्कादायक..काळेवाडी जवळ अपघातात घोड्यासह सांगोला तालुक्यातील एकजण जागीच ठार

धक्कादायक..काळेवाडी जवळ अपघातात  घोड्यासह सांगोला तालुक्यातील एकजण जागीच ठार

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आटपाडी तालुक्यातील काळेवाडी येथे झालेल्या अपघतात किडेबिसरी ता. सांगोला येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ०३ रोजी घडली. याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

यातील फिर्यादी हणमंत लक्ष्मण मलमे (वय ३१) रा. किडेबिसरी ता. सांगोला जि. सोलापूर यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.

आरोपी किरण यशवंत मलमे रा. किडेबिसरी ता. सांगोला, जि. सोलापूर याने मोटरसायकल वर भारत जयवंत मलमे यास बसवून काळेवाडी चिंचघाट कडून बानुरगड मार्गे कीडेबिसरी येथे घेऊन जात 

असताना मोटरसायकल भरधाव वेगाने निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून समोरून बाणुरगड कडून येणाऱ्या घोडा गाडीला जोराची धडक दिली.

या झालेल्या अपघातामध्ये मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले भारत जयवंत मलमे व घोडा देखील मृत्यू झाला. 

तसेच घोडा गाडी चालक जखमी झाला. यामध्ये मोटरसायकलचे आणि घोडा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटने बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments