ब्रेकिंग न्यूज.. भुयारी गटारी योजनेचे काम तात्काळ थांबून
सांगोला :- बहुचर्चित भुयारी गटारी योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून याकडे प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. ठेकेदार आणि प्रशासन यांची मिली भगत असल्याची चर्चा सुरू असताना,
आणि नागरिकांच्या तक्रारी मध्ये वाढ होत असताना प्रशासन कारवाई करण्याचे धाडस का दाखवत नाही असा प्रश्न उपस्थित करत, सदरचे काम तात्काळ थांबून या कामाची वरिष्ठ विभागाकडून चौकशी करण्यात यावी
अन्यथा संबंधित नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा सांगोला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सामाजिक कार्यकर्ते एकनाथ शेंबडे यांनी केली आहे.
सांगोला शहरात व उपनगरात सुरू असलेल्या भुयारी गटारी योजनेच्या कामामुळे नागरिक तसेच व्यापारी व्यावसायिक यांच्या मनामध्ये तीव्र संतापाची भावना उमटत आहे.
धुळीमुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे तक्रारींचा पाऊस सुरू असताना प्रशासन मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत आहे.
यासह भुयारी गटारी योजनेसाठी वापरलेली पाईप कर्मचारी एक्स ब्लेडने कापत असताना चे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जर या पाईपची साईज एक्साब्लेटने कापण्याजोगी असेल
तर वर्षानुवर्ष या पाईप मधून पाणी वाहून जाणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. संबंधित ठेकेदार व इंजिनियर या कामाकडे दुर्लक्ष करून केवळ काम उरकून घेण्याच्या तयारीत आहेत. वेळोवेळी पाणी मारले जात नाही
यामुळे सर्वसामान्य शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे सदरची योजना शहराच्या विकासासाठी आहे की नागरिकांना त्रास देण्यासाठी आहे असा सवाल उपस्थित करीत,
सांगोला शहरातील भुयारी गटारी चे काम तात्काळ थांबून सदर कामाची वरिष्ठ विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सामाजिक कार्यकर्ते एकनाथ शेंबडे यांनी केली आहे.
0 Comments