google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक.. सांगोला तालुक्यातील रेशनकार्डची कामे रखडली, ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ दहा दिवसांपासून बंद ; कामकाज ठप्प संकेतस्थळ बंद असल्याने तालुक्यात शिधापत्रिकेच्या संदर्भात एक शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित..

Breaking News

खळबळजनक.. सांगोला तालुक्यातील रेशनकार्डची कामे रखडली, ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ दहा दिवसांपासून बंद ; कामकाज ठप्प संकेतस्थळ बंद असल्याने तालुक्यात शिधापत्रिकेच्या संदर्भात एक शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित..

खळबळजनक.. सांगोला तालुक्यातील रेशनकार्डची कामे रखडली,


ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ दहा दिवसांपासून बंद ; कामकाज ठप्प संकेतस्थळ बंद असल्याने तालुक्यात शिधापत्रिकेच्या संदर्भात एक शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :बनावट शिधापत्रिकाधारकांना आळा बसावा, धान्य वितरणातील गळती रोखण्यासाठी तसेच रेशन दुकानातील काळाबाजार बंद करण्यासाठी शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. 

मात्र मागील दहा दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( आरसीएमएस) चे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे सांगोल्यात शिधापत्रिकेच्या संबंधित एक शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत. 

नवीन शिधापत्रिका काढणे, रेशन कार्ड मध्ये नावे वाढविणे, कमी करणे, विभक्त करणे अशा विविध कामासाठी नागरिकांना सेतू कार्यालयात येत असतात. काही वेळा दिलेल्या मुदतीत शिधापत्रिका धारकांना मिळत नाही. 

त्यामुळे नागरिकांची शिधापत्रिका मिळविण्यासाठी फरफट करावी लागते. असे प्रकार थांबविण्यासाठी यासाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली ( आरसीएमएस) विकसित करण्यात आली आहे.

 शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेमधील नावांची दुरुस्ती करणे, शिधापत्रिकेतील पत्ता बदलणे आदी कामे ऑनलाइन स्वरूपात केली जात आहेत. 

मात्र मागील दहा दिवसांपासून शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीचे संकेतस्थळ बंदच आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांची ऑनलाइन स्वरूपात होणारी कामे रखडली आहेत. 

संकेतस्थळ सुरू नसल्याने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. नागरिक सातत्याने शिधापत्रिकेच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी येतात

 त्यांना ही काम न होताच रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. संकेतस्थळ बंद असल्याने तालुक्यात शिधापत्रिकेच्या संदर्भात एक शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित राहिली असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. 

या संकेतस्थळाच्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार दिली आहे. शासनाने वरीष्ठ स्तरावरून यावर निर्णय घेऊन लवकरात लवकर संकेतस्थळ सुरू करावे 

याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे तहसीलदार संतोष कणसे व पुरवठा अधिकारी प्रांजली गावंड यांनी सांगितले आहे. आरसीएमएसचे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे काम करताना अडचणी येत आहेत. 

नागरिकांची कामे प्रलंबित राहत असल्याने त्यांच्या ही तक्रारी वाढत आहेत. सदरची ऑनलाईन प्रणाली सुरू होताच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. 

मा. प्रांजली गावंड - पुरवठा निरीक्षक अधिकारी

Post a Comment

0 Comments