धक्कादायक..जुन्या वादातून भरदिवसा शीर धडावेगळं केलं; छाटलेलं मुंडके अन् कुऱ्हाडीसह आरोपी सख्खे भाऊ पोलीस स्थानकात हजर
नाशिक : नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी गावात आज एक अतिशय खळबळजनक प्रकार घडला आहे.
ननाशी गावाच्या भरवस्तीत सकाळी 10.15 च्या सुमारास पूर्ववैमनस्यातून गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रा नजीक एकाचे मुंडके छाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यातील मारेकर्याने छाटलेले मुंडके आणि हत्यारासह आरोपी पोलीस स्थानकात हजर झाला आहे.
नववर्षाची सुरवात खुनी हल्ल्याने झाल्याने दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्हा खूनाच्या घटनेने हादरला आहे.
छाटलेलं मुंडके अन् कुऱ्हाडीसह आरोपी थेट पोलीस स्थानकात हजर
याबाबत आधिकची माहिती अशी की, गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांचे काही कारणावरून गेली दोन वर्षापासून वाद धुमसत होता.
या वादाच्या कारणावरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके याच्यांत पुन्हा वाद उफाळून आला.
नंतर त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केल्याने परिसरात हलकल्लोळ निर्माण झाला .
बोके बंधूंनी मयत वाघमारेचे मुंडके व हत्यार घेऊन सिनेस्टाईल पद्धतीने ननाशी पोलीस चौकीत घेवून आले. सोबतच झाल्या प्रकाराचा खुलासाही केला. खुनाच्या घटनेने ननाशीत तणावाची स्थिती असून पोलीसांची कुमक दाखल झाली आहे.
0 Comments