कोल्हापूर -कलबुर्गी इंटरसिटी, कोल्हापूर -हैदराबाद रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करा:-अशोक कामटे संघटना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
प्रामुख्याने या मागण्यात सकाळीं सत्रात कोल्हापूर - सोलापूर -कलबुर्गी- कोल्हापूर इंटरसिटी रेल्वे सेवा, मिरज- कुर्डूवाडी डेमो रेल्वेचा विस्तार कोल्हापुरपर्यंत करावा, सायंकाळीं 7 च्या सुमारास
कोल्हापूर - पंढरपूर- हैदराबाद रेल्वे,कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस , मिरज -सोलापूर रेल्वे या रेल्वे सेवा सुरू कराव्यात, या रेल्वेस सलगरे, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव या
स्थानकांवर अधिकृत थांबे मिळावेत, दादर- सातारा- दादर रेल्वे सेवा दररोज /नियमीत करावी, कुर्डूवाडी- कोल्हापूर मार्गावर क्रॉसिंग पॉईंटची संख्या वाढवावीत , सांगोला स्टेशनवर कोच इंडिकेटर्स बसवावेत ,
ज्येष्ठ नागरिकांना देशभरात रेल्वे प्रवासात तिकीट भाड्यात पूर्ववत सवलत मिळावी, लातूर - मिरज -कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करावे,कुर्डूवाडी- कोल्हापूर मार्गावर दर 3 तासांनी शटल सेवा दररोज ,नियमीत सुरू करावी. या
रेल्वे थांबे व इतर रेल्वेच्या आग्रही मागण्याबाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व खासदार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, व्यवस्थापक पुणे, सोलापूर यांनाही देण्यात आले आहेत.
रेल्वेचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार त्यामध्ये या मागण्या मंजूर व्हाव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे संघटनेने केली आहे
चौकट:-
*रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या प्रलंबित मागण्या मंजुर कराव्यात*
सोलापूर,कोल्हापूर, सातारा, मिरज व सांगली जिल्ह्यातील रेल्वेच्या सर्व समस्याचे रेल्वेच्या अर्थसंकल्पात
या तीनही विभागातील प्रश्नावर चर्चा होऊन प्रलंबित मागण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी . त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल.
निलकंठ शिंदे सर,
संस्थापक अध्यक्ष:- शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला
0 Comments