मोठी बातमी..रेशनकार्ड धारकांना दिलासा; रेशन कार्डच्या 'ई-केवायसी'ला पुन्हा मुदतवाढ ३१ मार्चपर्यंत 70 हजार 076 नागरिकांची ई - केवायसी करून घ्यावी ; धान्य दुकानदारांना तहसीलदार संतोष कणसे यांनी दिल्या सूचना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- शिधापत्रिका अद्ययावत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती ग्राह्य धरली जाते.
यासाठीची मुदत पूर्वी ३० नोव्हेंबर अशी होती. यासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे शिधापत्रिकांची ईकेवायसी रखडली होती. त्यामुळे ही मुदत आता वाढविण्यात आली आहे.
त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार जोडणीसह हातांचे ठसे दुकानांमध्ये द्यावेत, असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडून करण्यात आले आहे.
शिधापत्रिकाधारकांची अद्ययावत माहिती सध्या गोळा केली जात आहे. त्यासाठी ईकेवायसी अर्थात ग्राहकाची माहिती शिधापत्रिकेला जोडली जात आहे.
त्यात आधार क्रमांक व हाताच्या बोटांचे ठसे घेतले जात आहेत. ही प्रक्रिया आपण ज्या रेशन दुकानातून धान्य घेतो,
त्याच ठिकाणी दुकानदारामार्फत केली जात आहे. यातून बनावट शिधापत्रिकाधारकांना आळा बसणार आहे. तसेच धान्य वितरणातील गळती रोखण्यासाठीही ईकेवायसी करण्यात येत आहे.
प्रारंभी आक्टोबर महिन्यापर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत होती. रेशन कार्ड धारकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला नसल्याने,
व कार्ड धारकांकडून मुदत वाढवून मिळण्याबाबत मागणी केली जात असल्याने शासनाकडून दि. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.
ही मुदतही अनेक रेशन कार्डधारक ई-केवायसी करण्यापासून वंचित असल्याचे लक्षात आल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे यामुळे रेशनकार्ड धारकांना दिलासा मिळाला आहे.
सांगोला तालुक्यात रेशन कार्ड वरील 1 लाख 75 हजार 983 नागरिकांपैकी 1 लाख 05 हजार 907 नागरिकांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित 70 हजार 076 नागरिकांची ई - केवायसी प्रलंबित
असून यामुळे राज्य शासनाने ई-केवायसीकरिता मुदतवाढ दिली असून, सर्व शिधापत्रिकांच्या किमान एका सदस्याचे अर्थात १०० टक्के शिधापत्रिकांना आधार जोडणी करण्यात आली आहे.
मात्र, सरकारच्या निर्देशांनुसार सर्व शिधापत्रिकाधारकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे ईकेवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुक्यातील रेशन दुकानात ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली
असून, ज्या रेशन कार्डधारकांनी धान्य दुकानदार यांच्याकडे ई-केवायसी केली नाही अशा कार्डधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे
0 Comments