google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खुशखबर! लाडक्या बहिणीला आजपासून मिळणार दीड हजार रुपये

Breaking News

खुशखबर! लाडक्या बहिणीला आजपासून मिळणार दीड हजार रुपये

खुशखबर! लाडक्या बहिणीला आजपासून मिळणार दीड हजार रुपये 


मुंबई – महाराष्ट्रातील महिलांसाठी महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा होणार

 असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूकीच्या धामधुमीमुळे डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे.

जुलै ते नोव्हेंबरपर्यंत १५०० रुपयांप्रमाणे ७५०० रुपये महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. आता आजपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता 

वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण यावेळी १५०० रुपयेच मिळणार असून २१०० रुपये हे एप्रिलपासून मिळणार आहेत.

 कारण याबाबत आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. येणारा हप्ता हा २१०० रुपये येणार की १५०० रुपये येणार अशी चर्चा होती. 

त्याला पूर्णविराम लागणार आहे. मध्यंतरी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? 

असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

 लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील सात ते आठ दिवसांत देण्यात येईल, असे सांगितले होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत आतापर्यंत २ कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. 

जुलैपासून नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत एकूण ७५०० रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. 

आता डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याने राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिसेंबर महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहेत.

 पण, पहिल्या टप्प्यात फक्त ३५ लाख महिलांना लाभ मिळणार आहे. योजनेसाठी लागणारा ३५०० कोटी रुपयांची निधी सुद्धा वर्ग करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments