google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महूद शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Breaking News

मानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महूद शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मानगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या महूद शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगोला, ही अल्पावधीतच गती घेत असलेली संस्थेच्या महूद येथील चौथ्या शाखेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. गुरुवर्य श्री दिनुकाका पाठक आणि आ. गुरुवर्य श्री मुकुंद मुरारी प्रभुजी यांच्या शुभ हस्ते झाले.

या सोहळ्यात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार डॉ. श्री बाबासाहेब देशमुख यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाच्या उद्घाटनाची शोभा वाढवली. 

तसेच प्रमुख अतिथी म्हणून सांगोला विधानसभेचे माजी आमदार श्री शहाजी बापू पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ रेखाताई पाटील उपस्थित होत्या.

 कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन ( आबासाहेब ) इंगोले यांनी केली. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचे, तत्पर व विनम्र सेवांचे महत्त्व आणि बँकेच्या विविध योजनान बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले

 की संस्थेने सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे संस्था कमी कालावधीतच जवळ जवळ शंभर कोटींचा व्यवसाय पूर्ण करण्यात यशस्वी ठरली आहे, आणि मार्च २०२५ अखेर हा व्यवसाय 150 कोटींचा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ. श्री बाबासाहेब देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी संस्थेने व्यवसायिक, उद्योजक, आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक 

व वाणिज्य सेवा प्रदान करून त्यांना समर्थन दिल्याचे सांगितले.तसेच गुरुवर्य श्री दिनुकाका पाठक आणि श्री मुकुंद मुरारी प्रभुजी यांनी संस्थेच्या प्रगतीचे कौतुक करत संस्थेच्या प्रगती आणि त्याच्या भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन सौ अर्चनाताई इंगोले, व्हा. चेअरमन श्री सुखदेव रंदवे, संचालक श्री विजय वाघमोडे, श्री सचिन इंगोले, श्री विवेक घाडगे सर, श्री महादेवराव शिंदे, सचिव श्री अक्षय मुढे, भा.ज.यु.मो. उपाध्यक्ष श्री विनोद वाघमोडे, शेकाप. चे गट नेते

 श्री बाळासाहेब पाटील, स्व. गणपतराव देशमुख सह. सूतगिरणी मा. संचालक श्री अंकुश येडगे, युवा नेते श्री परमेश्वर कोळेकर,स्व. गणपतराव देशमुख सह. सूतगिरणी संचालक श्री संतोष पाटील, उद्योजक श्री गणेश बाचकर,

 युवा उद्योजक श्री शंकर पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे ता. अध्यक्ष श्री दिपक गोडसे, मा उप सरपंच महूद श्री दिलीप नागणे, शिवसेनेचे युवा नेते श्री अरुण नागणे, श्री अजित हात्तीगोटे,

 ची- महूद च्या सरपंच सौ शोभा कदम, महूद चे मा. सरपंच श्री बाळासाहेब ढाळे, शेकाप. चे युवा नेते श्री कल्याण लुबाळ, ची-महूद चे उपसरपंच श्री तुषार भोसले, खिलारवाडी चे उप सरपंच श्री विनोद बागल,

 उद्योजक श्री देवदत्त भोसले, श्री सचिन भोसले, इंजि. श्री दामाजी मोरे, MSEB कॉन्ट्रॅक्टर श्री दत्तात्रेय पवार , श्री दत्तात्रेय आसबे, व महूद परिसरातील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments