सांगोला तालुक्यातील ग्राहक चळवळ यशस्वी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा : तहसीलदार संतोष कणसे
जागरूक ग्राहक समाज व बाजार या दोन्हींना सक्षम करू शकतात : नागेश जोशी सांगोला तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी -ग्राहकांना कायद्याचे संरक्षण मिळाले असून शासनाने ग्राहक हक्क संरक्षण हा कायदा 1986 सालापासून अस्तित्वात आणला आहे.
या कायद्यामध्ये सन 1991, 1993, व सन 2002 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आजच्या जगात ग्राहक हा राजा आहे. जगाची अर्थव्यवस्था ग्राहकांभोवती फिरत असल्याने ग्राहकाचे महत्व कमालीचे वाढले आहे.
कायद्याने ग्राहकांना सुरक्षा हक्क, माहितीचा हक्क, वस्तू निवड करण्याचा हक्क, म्हणणे मांडण्याचा हक्क, तक्रार निवारण, आदी हक्क प्राप्त झाले आहेत.
त्यामुळे ग्राहकांचे शोषण कमी व्हायला मदत झाली असल्याचे प्रभावी विचार सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
तहसील कार्यालय व ग्राहक पंचायत सांगोला यांच्यावतीने 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी तहसीलदार संतोष कणसे यांनी आपले विचार मांडताना ग्राहक हक्क संरक्षण कायद्याच्या तरतुदीत झालेल्या सुधारणा
शासनाकडून केली जात असलेली अंमलबजावणी यावर प्रामुख्याने मार्गदर्शन करताना ग्राहक चळवळ यशस्वी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार
घेऊन तत्कालीन विचार न करता दीर्घकालीन विचार करावा. पुरवठा विभागात मोठे बदल करण्यात आल्याने ग्राहकांची गैरसोयी दूर झाली आहे. पुढील काळात सक्षम पिढी तयार करण्यासाठी ग्राहक चळवळ उपयोगी पडेल असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्राहक पंचायतीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार नागेश जोशी यांनी प्रस्ताविकात आपले विचार मांडताना महाराष्ट्रात स्व. बिंदू माधव जोशी यांनी सुरू केलेली
ग्राहक चळवळ ही राज्यापुरती मर्यादित न राहता तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व प्राप्त झाले आहे. ग्राहकांच्या रेट्यामुळे शासनालासुद्धा दखल घ्यावी लागली
असून ग्राहकांसाठी कायद्याचे संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक, काळाबाजार, शोषण इत्यादीस आळा बसला आहे. बनावट जाहिराती, गुणवत्तेचा अभाव, ग्राहक तक्रार निवारण न होणे अशा अनेक समस्या आज देखील उभ्या आहेत.
त्या सोडवण्यासाठी शासनाने कडक नियमांद्वारे प्रभावी ग्राहक कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. केवळ जागरूक ग्राहक समाज आणि बाजार या दोन्हींना सक्षम करू शकतात. स्पर्धात्मक किमतींमुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अभ्यास करूनच ग्राहकांनी वस्तू खरेदी कराव्यात असे प्रभावी विचार मांडून ग्राहक चळवळीचे महत्त्व सांगून राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या सर्वांना नागेश जोशी यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष प्रा.भगवंत कुलकर्णी यांनी आपले विचार मांडताना प्रत्येक ग्राहकांनी कायद्याचा अभ्यास करावा. वस्तू खरेदी करताना त्याचा ट्रेडमार्क पाहावा.
खरेदीची पावती घ्यावी विशेषतः सोन्याची खरेदी करताना हॉलमार्क पहावा. ग्राहकांचे हित जपणारे व्यापक कायदे करण्यात आले आहेत.
तक्रार निवारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्राहक न्याय मंचची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्यांनी ग्राहक पंचायत समितीकडे संपर्क साधल्यास त्यांना निश्चितपणे न्याय मिळवून दिला जाईल
असे आवाहन करून राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्त्व अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष डॉ. मानस कमलापूरकर यांनी
तहसीलदार संतोष कणसे यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रम साजरा केल्याबद्दल धन्यवाद देऊन सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक प्रियंका जाधव, महसूल सहाय्यक सचिन शेंडगे,
पुरवठा ऑपरेटर सागर दिघे, ग्राहक पंचायतीचे प्रमुख पदाधिकारी मोहसीन तांबोळी, मोहसीन मुलाणी, बाळासाहेब ताकभाते, पत्रकार उमेश मंडले, रास्त भाव धान्य दुकानदार, महसुल व पुरवठा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments