google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा बँकेतील २३८ कोटींच्या नुकसानीची होणार वसुली; 'या' दिग्गज नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Breaking News

सोलापूर जिल्हा बँकेतील २३८ कोटींच्या नुकसानीची होणार वसुली; 'या' दिग्गज नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सोलापूर जिल्हा बँकेतील २३८ कोटींच्या नुकसानीची होणार वसुली; 'या' दिग्गज नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तब्बल २३८ कोटी ४३ लाख रुपयांचं नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती चौकशी दरम्यान समोर आल्याने


 एकच खळबळ उडाली.यात अनियमित कर्ज वाटपामुळे बँकेचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

आता निश्चित करण्यात आलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या प्रकरणातील दोषींकडून करण्याचे आदेश चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत.

या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल, 

माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांचा समावेश आहे. राज्यात निवडणूक संपताच महाविकास आघाडीचे नेते अडचणीत येत असल्याच्या चर्चा या निमित्ताने रंगल्या आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक पूर्वी सक्षम बँक होती. नंतरच्या काळात राजकीय हस्तक्षेपामुळे वाटप झालेल्या कर्जाची वसुली न झाल्याने बँक बंद होण्याच्या मार्गावर आली.

 सध्या बँकेवर प्रशासक आहे. अशा परिस्थितीमध्ये बँकेची चौकशी सुरू होती. या चौकशीत अनेक नेत्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर तीस कोटी सत्तावीस लाख याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. माजी मंत्री आणि आता आमदार म्हणून निवडून आलेले

 दिलीप सोपल यांच्यावर ३० कोटीची, दुसरे संचालक दीपक साळुंखे यांच्यावर वीस कोटी बहात्तर लाखाची थकबाकी दाखवण्यात आली आहे, 

अशा पद्धतीने अनेक नेते आहेत. यामध्ये दिवंगत नेते सुधाकर परिचारक, दिवंगत सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याही नावांचा समावेश आहे.

३२ संचालकांसह दाेन अिधकाऱ्यांचा समावेश

माजी आमदार राजन पाटील, गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप 

यांच्यासह ३२ संचालक, दोन अधिकारी अशा ३५जणांवर जबाबदारी िनश्चित करण्यात आली आहे. या नुकसानीस त्यांना जबाबदार धरल जात आहे. 

२३८ कोटी ४३ लाख रुपये १२ टक्के व्याजाने वसूल करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. यातील बहुतांश नेते ते महाविकास आघाडीतील अाहेत. यातील काही नेते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

काेणाकडे किती रक्कम

माजी मंत्री दिलीप सोपल (३०.२७ कोटी), विजयसिंह मोहिते पाटील (३०.०५ कोटी), दीपक साळुंखे (२०.७२ कोटी),

 सुधाकर रामचंद्र परिचारक (११.८३ कोटी), अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील (१६.९९ कोटी), भाजप आमदार समाधान अवताडे यांचे चुलते बबनराव अवताडे (११.४४ कोटी), दिलीप माने (११.६३ कोटी), सुनंदा बाबर (१०.८४ कोटी), 

संजय शिंदे (९.८४ कोटी), दिवंगत माजी आमदार एस. एम. पाटील (८.७१ कोटी), चंद्रकांत गणपतराव देशमुख (८.४१ कोटी), जयवंत जगताप (७. ३० कोटी). रणजितसिंह मोहिते पाटील (५५.५४ लाख), राजन पाटील (३.३४ कोटी), रामचंद्र महाकू वाघमोडे 

(१.४८ कोटी), राजशेखर शिवदारे (१.४८ कोटी), अरुण कापसे (२०.७४ कोटी), संजय नामदेव कांबळे (८.४१ कोटी), बहिरू संतू वाघमारे (८.४१ कोटी), सुनील नरहरी सातपुते (८.४१ कोटी), चांगदेव शंकर अभिवंत (१.५१ कोटी), 

रामदास बिरप्पा हाक्के (८.४१ कोटी), विद्या अनिलराव बाबर (१.५१कोटी), रश्मी बागल (४३.२६ लाख), नलिनी सुधीरसिंह चांदेले (८८.५८लाख), सुनिता शशिकांत बागल (१.५१कोटी) या प्रमाणे जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. 

या व्यतिरिक्त बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक किसन विश्वंभर मोटे, काशिलिंग रेवणसिद्ध पाटील आणि सनदी लेखापालावरही आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवण्यात आला आहे .

प्रक्रियेचा खर्च ११ लाख २५ हजार रुपये

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसानीस जबाबदार असलेल्या तत्कालीन संचालक, अधिकारी व कर्मचारी अशा ३५ जणांवर २३८ कोटी ४३ लाख ९९९ रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. 

जबाबदारी निश्चिती होऊन २० दिवस झाले तरीही या प्रकरणातील पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले सहकार कायदा कलम ९८ अन्वयेचे वसुली दाखले पुण्याच्या विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी अद्यापही दिलेले नाहीत. 

त्यामुळे ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी राबविलेल्या प्रक्रियेचा खर्च ११ लाख २५ हजार रुपये देखील माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडूनच वसूल केला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments