google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस;लव्ह मॅरेज केलं मग मुलबाळ होत नाही म्हणून भोंदूबाबाकडे दावल,मग काय भोंदू बाबाने मुलीला चाबकाने फोडून काढले…अखेर भोंदूबाबासह दोघांवर गुन्हा दाखल…!!

Breaking News

धक्कादायक..इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस;लव्ह मॅरेज केलं मग मुलबाळ होत नाही म्हणून भोंदूबाबाकडे दावल,मग काय भोंदू बाबाने मुलीला चाबकाने फोडून काढले…अखेर भोंदूबाबासह दोघांवर गुन्हा दाखल…!!

धक्कादायक..इंदापूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस;लव्ह मॅरेज केलं मग मुलबाळ होत नाही म्हणून


भोंदूबाबाकडे दावल,मग काय भोंदू बाबाने मुलीला चाबकाने फोडून काढले…अखेर भोंदूबाबासह दोघांवर गुन्हा दाखल…!!

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एका भोंदू बाबाने युवतीला अमानुषपणे मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय.हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुलीच्या वडीलाने तात्काळ इंदापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

अन याप्रकरणी संबंधित भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी युवतीचे वडील दत्तात्रय प्रभाकर गावडे ( रा.माऊलीनगर,बारामती,ता.बारामती, जि.पुणे ) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हा गुन्हा दाखल केला आहे.या तक्रारीवरून 

भा.द. वि.कलम ११८ (१),११५ (२),३(५) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणेबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ (२ ) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर नवनाथ जगताप ( रा.राधाकृष्ण अपार्टमेंट पडस्थळ रोड,ता. इंदापूर,जि.पुणे ) याच्यासह देवऋषी जीवन कुऱ्हाडे ( रा.इंदापूर ) मोहन राजू गायकवाड ( रा. गोरेगाव,मुंबई ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत..

नेमकं प्रकरण काय ?

बारामती तालुक्यातील फिर्यादी दत्तात्रय गावडे यांची मुलगी प्रतीक्षा हिने २०२१ मध्ये बारामती टी.सी कॉलेजमध्ये असताना,मयुर नवनाथ जगताप ( रा. राधाकृष्ण 

अपार्टमेंट,पडस्थळ रोड,इंदापूर जि.पुणे ) याच्याशी पळून जाऊन लग्न केले होते.यानंतर २१ नोव्हेंबर २०२४ रोजी गावडे यांचा मुलगा सिद्धार्थ याला प्रतीक्षा ने मोबाईलवर पाठवलेले व्हिडिओ दाखवले

 यात एक देवऋषी प्रतीक्षा हीला केसाला धरून चाकाचे फटके येत असल्याचे निदर्शनास आले.यात प्रतीक्षा ही मला मारू नका मला लागतंय असे जोराने ओरडून सांगत 

असताना देखील तिला अमानुषपणे मारहाण केल्याचे दिसल्याने,दत्तात्रय गावडे यांनी मुलीकडे धाव घेत विचारपुस केली असता,लग्नानंतर प्रतीक्षा आणि तिचा नवरा मयुर बाहेर फिरायला गेल्याचे सांगत,यानंतर प्रतीक्षा वारंवार आजारी पडत असल्याने व तिला मूलबाळ होत 

नसल्याने व ती मयूर याने त्याच्या ओळखीचे इंदापूर येथील देवऋषी जीवन करणे यांची भेट घेतली असता,कुऱ्हाडे याने महाकाली देवीची पूजा करा तुमच्या घरातील सगळे दोष दूर होतील व बायको ही आजारी पडणार नाही असे सांगितले.

महाकाली देवीची पूजा घालत असताना, प्रतीक्षा विचित्र वागत असल्याचे सांगत देवऋषी याने हिला बाहेरची भूताखेताची बाधा झालेली आहे.असे सांगत तिचे भूत उतरावे लागेल याचे तिचे केस धरून चाबकाचे फटके द्यावे लागतील 

असे सांगत प्रतीक्षा हिला अंगावर,पाठीवर चाबकाचे फटके मारण्यात आले,हा सर्व प्रकार पती मयूर याने आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला असल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी मुलगी प्रतीक्षा हीला अंगावर चाबकाने फटके मारून तीचे केस ओढून मारहाण करून मारहाणीचा व्हिडिओ काढल्याचे फिर्यादीत मुलीचे वडील दत्तात्रय गावडे यांनी म्हंटलय. याप्रकरणी या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कोकणे हे करीत आहेत..

Post a Comment

0 Comments