मोठी बातमी...डाळिंब निर्यातीसाठी सांगोल्यातील 5 हजाराहून अधिक शेतकऱ्यांची अनारनेट वर नोंदणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : डाळिंब पीक नैसर्गिक संकटात असतानाही डाळिंब निर्यात करण्यासाठी शेतकरी पुढे येत असल्याचे चित्र आहे. यंदा डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. राज्यातील 7 विविध जिल्ह्यातून आजअखेर
२१ हजार २१५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 13 हजार 256 यामध्ये सांगोला तालुक्यातील 5 हाजाराहून अधिक शेतकऱ्यांनी अनारनेट वर ऑनलाइन नोंदणी केली आहे.
शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, या वर्षीही डाळिंबाची निर्यात वाढेल, असा विश्वास अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून डाळिंब नैसर्गिक आपत्तीमुळे धोक्यात आले आहे. परिणामी, डाळिंबाच्या उत्पादनातही काही प्रमाणात घट झाली. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाला अपेक्षित दर मिळत आहे.
अशा परिस्थितीतही सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत. गतवर्षी डाळिंबाची निर्यात वाढली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.
देशातून सर्वाधिक डाळिंब निर्यात महाराष्ट्रातून होते. राज्यातून प्रामुख्याने युरोपियन देश, सौदी अरेबिया, श्रीलंका, आणि थायलंड यासह बांगलादेश, नेपाळ नेदरलॅंड या देशात डाळिंबाची निर्यात केली जाते.
यंदा डाळिंबाला पाणीटंचाई, आणि अतिपावसाचा फटका बसला आहे. परिणामी डाळिंबाला पोषक वातावरण नसल्याने सेटिंग होण्यास अडथळे निर्माण झाले होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत डाळिंब बागा साधल्या आहेत.
यंदा डाळिंब निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करू लागले आहेत. आतापर्यंत २१ हजार २१५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली,
यामध्ये सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा अधिक समावेश आहे. तर त्या खालोखाल सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत ही बाब चांगली आहे.
त्यामुळेच यंदाही शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी चांगली नोंदणी केली असून निर्यात वाढेल असा विश्वास अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी व्यक्त केला आहे.
डाळिंबाचे कोठार म्हणून सांगोल्याची सबंध देशभरात ओळख आहे. सांगोला तालुक्यातील डाळिंब हे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहे. अनेक संकटाचा सामना करत येथील बळीराजा
शेतकऱ्यांनी जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर भयान अशा माळरानावर कमी पाण्यावर चांगल्या प्रकारचे डाळिंब उत्पादन घेतले आहे. आजही तालुक्याचे डाळिंब देशभरात नाव गाजवत असून,
सांगोल्यातील डाळींब मार्केटमध्ये आजही मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या खरेदी आणि विक्री मधून उलाढाल होत आहे. दरम्यान सांगोल्या डाळिंब खरेदीसाठी पर राज्यातील व्यापाऱ्यांनी सांगोल्यात ठिय्या मांडला आहे.
शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन जागेवरूनच मालाची खरेदी होत असल्यामुळे ऑनलाईन नोंदणीकडे शेतकरी वळला नाही. परंतु चांगला दर मिळत असेल तर तालुक्यातील डाळिंब फळ बागायतदार शेतकरी पुन्हा ऑनलाईन अनारनेट वरील नोंदणी कडे वळेल असा विश्वास आहे.
मा. सतीश पाटील प्रगतशील शेतकरी चोपडी - केशरमाती उद्योग समूह सांगोला
0 Comments