google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार

Breaking News

निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार

निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार


मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना  गेमचेंजर ठरली. त्यामुळे, भाजप महायुतीने 

तब्बल 236 जागांसह स्पष्ट बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. तर, काँग्रेस महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवरच समाधान मानावे लागले. 

त्यामुळे, निवडणुकीत लाडक्या बहिणीने महायुतीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचं म्हटलं.

 तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहि‍णींचे आभार मानले आहेत. एकनाथ शिंदेंनी  वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या,

 तसेच लाडक्या बहि‍णींसाठी मोठी घोषणादेखील केली. शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहि‍णींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर केले.

लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवला आहे. राज्यात लाडकी बहिण योजना सुपरहीट झाली. माझी बहिण लाडकी, 

विरोधकांच्या मनात भरली धडकी, तर काही लोकं फिट येऊन चक्कर येऊन पडल्याचे सांगत विरोधकांवर टीका केली. एक दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे.

 विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धूऊन टाकलंय अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहि‍णींवर कौतुकाचा वर्षाव केला. राज्यात यंदा लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले, 

हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. त्यामुळे, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता, लवकरच तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे 2100 करणार असून याचासुद्धा निर्णय 

आपण घेतल्याचे शिंदेंनी सांगितले. तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी झाला, समोरच्या लोकांना तुम्ही डम्पिंगमध्ये टाकून दिलं असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता विरोधकावर टीका केली.

दरम्यान, निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय नेत्याकडून लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला जात आहे. लाडकी बहीण योजनेमुळेच भाजप महायुतीला एवढा मोठा विजय झाल्याचं बोललं जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याचं दिसून येत असल्याचं म्हटलं. सत्ताधाऱ्यांनी लाडक्या बहिणींना योजना बंद होण्याची भिती दाखवून 

मतदानासाठीचं आवाहन केलं होतं, असेही पवार यांनी म्हटलं. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजनेमुळे मतदानाचा टक्का वाढला असून आम्हाला त्याचा फायदा झाल्याचं म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments