google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक... ज्योत घेऊन येत असलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; मंगळढ्यातील दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी, गावावर पसरली शोककळा

Breaking News

धक्कादायक... ज्योत घेऊन येत असलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; मंगळढ्यातील दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी, गावावर पसरली शोककळा

 धक्कादायक... ज्योत घेऊन येत असलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; मंगळढ्यातील दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी, गावावर पसरली शोककळा 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

तुळजापूरहून गोणेवाडी (ता.मंगळवेढा ) येथे ज्योत घेवून जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.

यात दोघे ठार झाले असून सहाजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातात प्रदीप क्षीरसागर (वय २८ वर्ष), नेताजी कराळे (वय ३० वर्ष) दोघे (रा.गोणेवाडी ता. मंगळवेढा) अशी मयत दोघांची नावे आहेत.

महेश बंडगर (वर्ष १७), वैभव हजारे (वर्ष २४), सोहेल मुलानी (वर्ष २५), समाधान मासाळ (वर्ष ३०), रोहित कसबे (वर्ष २०), रोहित चव्हाण (वर्ष १२ सर्वजण रा.गोणेवाडी ता. मंगळवेढा) हे जखमी झाले आहेत.

गोणेवाडी गावावर शोकाकुल पसरली असून गावातील सरपंच बाबासाहेब मासाळ, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ, पोलीस पाटील संजय मेटकरी  यांनी 

तात्काळ जाऊन जखमींना मदत केली व सदर जखमी भाविकांची सोलापूर रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments